उस्मानाबाद -: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकिय वस्तीगृहात सन 2013-14 या शैक्षणिक वर्षाकरिता शालेय विभागाच्या विद्यार्थ्यासाठी दि. 1 मे ते 15 मे 2013 पर्यंत विनामुल्य अर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत तर महाविद्यालयीन विभागाचा निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत प्रवेश अर्ज वसतीगृहाचे गृहपाल यांच्याकडून घेऊन जाणे व परिपुर्ण भरुन सादर करणे आवश्यक राहील. तरी गरजू विद्यार्थ्यांनी विनामुल्य प्रवेश अर्जासाठी गृहपाल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा.प्रवेशित विद्यार्थ्यासाठी वसतीगृहात निवास, भोजन, गणवेश, स्टेशनरी, निर्वाह भत्ता रु. 600/-,नाईट ड्रेस, चप्पल, बुट, छत्री, रेनकोट, शैक्षणिक साहित्य, अंथरुण पांघरुण आदि सुविधा विनामुल्य पुरविल्या जातात.   
 
Top