सोलापूर -: जिल्हयातील दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह सर्वांनीच सामुहिक प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केले.
पोलीस मुख्यालयाच्या मैदानात शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांना पोलीस पथकांनी मानवंदना दिली. त्यांचेसमवेत जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, शहर पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेश प्रधान उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्हा दुष्काळाच्या भीषण झळांनी होरपळत असून जिल्हा प्रशासन अतिशय सतर्क राहून चारा, पाणी आणि रोजगार देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या नैसर्गिक आपत्तीवर आपण सगळयांनी मिळून मात केली पाहिजे. जिल्हयाने अशा बिकट परिस्थितीतही महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात चांगले काम करुन राज्यात सगळयात जास्त म्हणजे सहा कोटी रुपये बक्षिसाची रक्कम मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. राज्यात नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीसांना त्यांनी यावेळी आदरांजली वाहिली.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचे औपचारीक उदघाटन करण्यात आले. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सी. आर. रोडे, पोलीस निरिक्षक के. एस. धांडेकर, पोलीस नाईक आय.एम. पटेल यांना उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले. गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेला आयएसओ मानांकन 9001-2008 हे प्रमाणपत्र देण्यात आले. अक्कलकोट तालुक्यातील श्री. पुजारी यांना आदर्श तलाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम आलेल्या सांगोला तालुक्यातील वाणी चिंचाळे ग्रामपंचायतीला, व्दितीय पंढरपूर तालुक्यातील शेळवे ग्रामपंचायतीला तर तृतीय दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव तांडा ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्यात आले. तसेच यावेळी गुणवंत खेळाडू, क्रिडा मार्गदर्शक, क्रिडा संघटक आणि लघुउद्योग क्षेत्रात भरीव कामगीरी करणा-या उद्योजकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशीगंधा माळी, माजी आमदार नरसिंग मेंगजी, वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
नवीन प्रशासकीय इमारतीत अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, श्रीपती मोरे, जिल्हा उपनिबंधक श्रीकांत मोरे, यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.