बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: अभिजित राऊत यांच्‍या 24 व्‍या वाढदिवसानिमित्‍त राज विजय युवा मंचच्‍यावतीने राऊत चाळ येथे आयोजित केलेल्‍या क्रिकेट स्‍पर्धेचे उदघाटन कॉंग्रेसचे शहराध्‍यक्ष विजय राऊत यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
    यावेळी चंद्रकांत पवार, रविंद्र राऊत, सागर कावळे, अभिजीत राऊत, रणवीर राऊत, आप्‍पा मोहिते, निलेश मस्‍के, विनोद बोकेफोडे, पांडू पाटील, आकाश मस्‍के, पंकज वाघमारे, सागर लंकेश्‍वर, संजय कांबळे, नितीन राऊत, भैय्या घोलप, शिवराज खंडेलवाल, कोरेकर सर, रोहित खैरे, नागेश मोहिते, अजय राऊत, तुषार राऊत, बबलू डिडवळ, गोटू पवार यांच्‍यासह क्रीडाप्रेमी मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
    या स्‍पर्धेकरीता 5001 ते 1001 पर्यंत पारितोषिके ठेवण्‍यात आली आहे. अभिजीत राऊत यांचया वाढदिवसाचा जाहीर कार्यक्रम बार्शी येथील तानाजी चौक, कसबा पेठेत दि. 31 मे रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्‍यात आला आहे.
 
Top