नळदुर्ग -: खास नळदुर्ग शहरासाठी भैरवनाथ शुगर्स सोनारी (ता. परंडा) यांच्‍या सौजन्‍याने रूग्‍णवाहिका उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. या रूग्‍णवाहिकेचे उदघाटन जेष्‍ठ स्‍वातंत्र्य सैनिक जनार्धन होर्टीकर गुरुजी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख तथा नगरसेवक कमलाकर चव्‍हाण हे होते.
    नळदुर्ग शहर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून या मार्गावरुन मोठ्याप्रमाणावर वाहनांची एकसारखी रिघ लागलेली असते. त्‍यामुळे परिसरात मोठ्याप्रमाणावर अपघात होवून त्यात अनेकजण जखमी तर काहीजणांचा मृत्‍यू होतो. अपघातातील जखमींना शासकीय पातळीवर म्‍हणावी तितकी सुविधा या ठिकाणी उपलब्ध्‍ नसल्याने गंभीर जखमींना उपचारासाठी सोलापूरला हलवावे लागते. त्‍यामुळे अपघातग्रस्‍तांना तातडीची सेवा मिळण्यासाठी शिवसेनेची अनेक दिवसापासूनची रूग्‍णवाहिकेची मागणी होती. शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे यांच्‍या आदेशाने भैरवनाथ शुगर्सने नळदुर्ग शहरासाठी रूग्‍णवाहिका दिली आहे. नळदुर्गहून सोलापूरला रूग्‍णांना घेऊन जाण्‍यासाठी नाममात्र रक्‍कम घेतली जाईल, असे सांगण्‍यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे तुळजापूर तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहरप्रमुख संतोष पुदाले, धिमाजी घुगे, युवा सेनेचे तालुकाध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर घोडके, सुशांत भूमकर, शाम कनकधर, बंडू कसेकर, मनोज मिश्रा, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. रूग्‍णवाहिकेसाठी 8983774044 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.
 
Top