नळदुर्ग -: बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श समोर ठेवून धर्मवीर संभाजी राजे यांनी हिंदवी स्वराज्याचा वारसा चालवित सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी जिवनाच्या अखेरपर्यंत प्रयत्नशील राहिले. तेंव्हा संभाजी राजे यांचा आदर्श समोर ठेवून युवकांनी सामाजिक कार्यात सक्रिय झाले पाहिजे, असे आवाहन शिवसेनेचे माजी जि.प. सदस्य गणेश सोनटक्के यांनी वागदरी (ता. तुळजापूर) येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे मदनराजे पाटील मित्रमंडळ व धर्मवीर संभाजी राजे महाराज जयंती उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गणेश सोनटक्के हे उपस्थित होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वागदरी ग्रामपंचायतीचे सरपंच राजकुमार पवार हे होते. प्रारंभी श्रीशैल्य सुरेश महाराज, सरपंच राजकुमार पवार, गणेश सोनटक्के यांच्या हस्ते छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी गुणवत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देवून तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या गुणवंतांचा फेटा, पुष्पगुच्छ, श्रीफळ व संभाजी महाराज यांची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच विजयसिंग ठाकूर, आनंदा धुमाळ, सुभाष सुरवसे, किसन पाटील, सुरेशसिंग परिहार, युवा कार्यकर्ते अमोल पाटील, मदन पाटील, नागनाथ सुरवसे, संजय पवार, बालाजी बिराजदार, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष मोहनसिंग चव्हाण, पोलीस पाटील बाबुराव बिराजदार, सुकसिंग ठाकूर यांच्यासह मदनराजे मित्रमंडळ व जयंती उत्सव मंडळाचे अमोल पवार, दिपक धुमाळ, आप्पा मिटकर, सत्तार शेख यांच्यासह ग्रामस्थ होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गणेश बिराजदार यांनी तर सुत्रसंचालन दत्तात्रय सुरवसे यांनी केले. रावण पवार यांनी आभार मानले.