नळदुर्ग -: अणदूर (ता. तुळजापूर) येथील वत्सलानगर मधील ग्रामस्थांना गेल्या दहा दिवसापासून पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायतीवर भव्य घागर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, यावेळी संतप्त गामस्थांचा सरंपचाशी शाब्दीक चकमक उडाली.
अणदूर ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे अणदूर गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. गावामध्ये पाच दिवसाला पाणीपुरवठा होत असून हा पाणीपुरवठा इतका अत्यल्प असतो की त्यातून त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुध्दा सुटत नाही. गावातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून मंगळवारी ग्रामपंचायतीवर रिकाम्या घागरी घेऊन घागर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदविला. आपला रोष व्यक्त करत पाणी द्या पाणी, अशी घोषणाही यावेळी मोर्चामध्ये सहभागी महिलांनी दिल्या. गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चा ग्रामपंचायत परिसरात येताच सरपंच शशिकला शेटे व मोर्चात सहभागी ग्रामपंचायत सदस्य अरविंद आलुरे यांच्यात शाब्दीक चकमक झाली. पाणीपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी गेलेल्या मोर्चेकरांना दिलासा मिळाले नाही तर उलट मनस्तापच सहन करावा लागला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अँड. दीपक आलुरे, ग्रामपंचायत सदस्य अरविंद आलुरे, मुलुंग शेख, सुशांत आलुरे, सामाजिक कार्यकर्ते आर.एस. गायकवाड, दयानंद काळुंके, दयानंद मुडके, शाम गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या संजीवनी आलुरे, काशीबाई हागलगुंडे आदीजण मोर्चात सहभागी झाले होते. तर या ठिकाणी सरपंच शशिकला शेटे, उपसरंपच संगप्पा हागलगुंडे, ग्रामविकास अधिकारी सावरु माशाळकर, बालाजी घुगे यांची उपस्थिती होती. सरपंचांनी गावक-यांना त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ग्रामविकास अधिकारी माशाळकर यांनी आगामी काळात पाण्याचे काटेकोरपणे नियोजन केले जाईल असे सांगितले. पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी निवेदन देण्यात आले.