मुंबई -: भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये अल्पसंख्याकांचे प्रमाण वाढावे यासाठी राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग तसेच केंद्रीय हज समितीमार्फत अल्पसंख्याकांना आयएएस-आयपीएस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. या योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या शहादा (जि. नंदुरबार) येथील शकील मेहमूद अन्सारी आणि सातारा येथील परवेज नायकवडी या दोन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळविले असून त्यांचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
       विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान, माजी आमदार जनार्दन चांदुरकर, अल्पसंख्याक विकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती थँक्सी थेक्केकरा, यशदातील समता सामाजिक न्याय केंद्राचे संचालक रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
      मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
Top