मुंबई -: ठाणे, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगांव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर व अमरावती या जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीची योजना सन 2012-13 मध्ये राबविण्याकरिता रुपये एक लाख रुपये इतकी रक्कम खर्च करण्यास शासनाने प्रशासकीय व वित्तिय मान्यता दिली आहे.
    राज्यातील 12 जिल्ह्यांतील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने तसेच आदिवासींना पौष्टिक आहार मिळविण्यासाठी आदिवासी कुटुंबाच्या घराभोवती असलेल्या परसबागेत विशिष्ट भाजीपाला व फळांची निवड करुन लागवड करण्यास प्रोत्साहन देण्याची फळझाडे व भाजीपाला पिकाची योजना राज्यात सन 2003-04 पासून राबविण्यात येत आहे.  राज्यात आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण जास्त असल्याने त्यांचे आहारात जीवनसत्व व इतर आवश्यक पोषकद्रव्ये उपलब्ध होण्याच्या हेतूने या कुपोषित भागासाठी पौष्टिक आहार योजना तयार करण्यात आली आहे.  या योजनेमुळे परसबागेत उपयुक्त फळे व भाजीपाल्याचा समावेश करुन आहार अन्नद्रव्याच्या दृष्टीने परिपूर्ण करता येणे शक्य होईल. 
       या योजनेकरिता सन 2012-13 या आर्थिक वर्षात रु. 20 लक्ष इतकी तरतूद करण्यात आली आहे.  त्यापैकी 75 टक्के निधी वितरित करण्यात आला आहे.
 
Top