सोलापूर :- राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे
     शनिवार दि. 4 मे 2013 रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सोलापूरकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.20 वाजता मोटारीने शासकीय विश्रामृगह येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता राखीव. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे आगमन. सकाळी 11 ते 1 वाजता सोलापूर जिल्हा टंचाई परिस्थिती आढावा बैठक (मा. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सोलापूर) दुपारी 1.40 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व दुपारी 1.45 वाजता हेलिकॉप्टरने घेरडी हेलिपॅड ता. सांगोलाकडे प्रयाण. दुपारी 2.20 वाजता घेरडी हेलिपॅड, ता. सांगोला येथे आगमन. नंतर दुपारी 2.25 वाजता मोटारीने धवल दुध उत्पादन सहकारी संस्था, घेरडी ता. सांगोला येथे आगमन.  दुपारी 2.30 वाजता मोफत पशुखाद्य पुरवठा योजनेचा शुभारंभ.  सायंकाळी 4 वाजता तरंगेवाडी (जवळा) ता.सांगोलाकडे प्रयाण. 4.15 वाजता तरंगेवाडी (जवळा) ता. सांगोला येथे आगमन. दुपारी 4.15 वाजता शिरपूर पध्दतीने बंधारा गाळ काढणे कामाचा शुभारंभ. दुपारी 4.45 वाजता मोटारीने घेरडी हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 4.55 घेरडी हेलिपॅड येथे आगमन. सायंकाळी 5 वाजता हेलिकॉप्टरने बारामतीकडे प्रयाण.
 
Top