लातूर :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि मॅट्रीकोत्तर शिक्षण फी व परीक्षा फी प्रदाने या दोन योजना सन 2013-14 या आर्थिक वर्षापासून ऑन लाईन करण्याचा निर्णय 20 मार्च 2013 च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी त्वरीत त्याच्या जवळच्या कोअर बॅकिंगची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत शुन्य बॅलन्सवर, बॅंक खाते उघडावे, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, लातूर यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत (1) राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, (2) भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या आणि व्यावसायिक महाविद्यालयाच्या वसतीगृहात रहात असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता (3) सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता (4) सर्व शासकीय वसतीगृहामधील प्रवेश प्रक्रिया (5) इयत्ता 5 वी ते 7 वी मधील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (6) इयत्ता 8 वी ते 10 वी मधील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचा समोवश आहे.
वरील योजनांचा 2013-14 साठी व त्यापुढील कालावधीत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी त्वरीत त्यांच्या जवळच्या कोअर बँकिग सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे बँक खाते (Student Account) शुन्य बँलन्सवर (Zero Balance) उघडावे. अशा विद्यार्थ्यांच्या पात्रतेचे निकष असे, सन 2013-14 मध्ये इयत्ता 5 वी पासून इयत्ता 10 वी पर्यंत शिकत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थींनी. सैनिक शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीतील ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयाच्या आत आहे आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयाच्या आत आहे असे अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी/विद्यार्थींनी. भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या, व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या आणि व्यावसायिक महाविद्यालयाच्या वसतीगृहात रहात असलेल्या अनुसूचित जातीतील ज्या पालकांचे वार्षिक उत्पन दोन लाख रुपयाच्या आत आहे आणि विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयाच्या आत आहे असे अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी/ विद्यार्थींनी.
अधिक माहितीसाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (अनुसूचित जाती) बाबतीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याशी त्वरीत संपर्क साधावा. त्यांच्याकडून पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यास संबंधित विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त, समाज कल्याण यांच्याशी संपर्क साधावा. सदर कार्यालयाची माहिती https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.