सोलापूर -: प्रेम संबंधातून लग्‍नाचे आमिष दाखवून एका तरुणीला गर्भवती करुन एका तरुणीला गर्भवती करुन दुस-या तरुणीबरोबर विवाहाचा प्रयत्‍न करणा-या सोलापूर येथील जुना कारंबा नाका येथे राहणा-या नवरदेवाला हळदीच्‍या अंगाने पोलिसांनी बलात्‍कार व अँट्रासिटी प्रकरणात रविवारी रात्री अटक केली आहे.
    संजय नागनाथ जाधव (वय 24, रा. जुना कारंबा नाका) असे अटक करण्‍यात आलेल्‍याचे नाव आहे. सोमवारी त्‍याच्‍या घराजवळच संजय याचा विवाह होणार होता. रविवारी सायंकाळी त्‍याला हळद लावण्‍यात आली होती. परंतु नवरदेवाने प्रेमी एकीबरोबर केले आणि विवाह दुस-या मुलीबरोबर करणार असल्‍याने त्‍या मुलीने थेट पोलिसांकडचे धाव घेतली व आपली कैफियत मांडली. त्‍यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिंदे व त्‍यांच्‍या पथकाने विवाह सोहळा होणा-या ठिकाणी धाव घेतली आणि नवरदेव संजय याला हळदीच्‍या अंगानेच अटक केली. काय प्रकार चालू आहे, हे लवकर अनेकांना समजले नाही. परंतु पोलिसांनी खरी बाजू त्‍यांच्‍यासमोर मांडल्‍यानंतर अनेकांचा राग शांत झाला.
    संजय हा एका खासगी मिलमध्‍ये काम करत असे. त्‍याचठिकाणी त्‍या मुलीची आई कामाला होती. ती मुलगी आपल्‍या आईला जेवणाचा डबा देण्‍यासाठी मिलमध्‍ये यायची, त्‍यातूनच तिची संजयबरोबर ओळख झाली आणि त्‍याचे प्रेमात रुपांतर झाले. संजयने तिला लग्‍नाचे आमिष दाखविले आणि तिच्‍यावर बलात्‍कार केला. त्‍यानंतर ती मुलगी दीड महिन्‍याची गरोदर राहिली. परंतु त्‍याने तिच्‍याशी विवाह करण्‍यास नकार दिला.
    संजय याने आता दुस-याच मुलीशी विवाह करण्‍याचा घाट घतला. त्‍याप्रमाणे त्‍याचा विवाह ठरला. त्‍याला हळद लावण्‍यात आली. सोमवारी त्‍यावर अक्षता टाकण्‍यात येणार होत्‍या. तत्‍पूर्वी त्‍याला गजाआड केले आहे.
 
Top