उस्मानाबाद -: श्री संत गोरोबा काका यांच्या जीववनावर आधारित 'वैराग्यमहामेरु' या चरित्रात्मक कादंबरीचे संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त तेर येथे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
दीपक खरात लिखित 'वैराग्यमहामेरु' ही कादंबरी सन 2004 साली ध्वनिमुद्रीकेच्या स्वरुपात प्रकाशित झालेली होती. ही आता पुस्तकाच्या स्वरुपात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या प्रकाशन कार्यक्रमप्रसंगी लेखक दीपक खरात, प्रसिध्दीप्रमुख सतीश कुंभार, तेर येथील नागरीक बालाजी फंड, रचना कन्स्ट्रक्शनचे प्रमुख दत्तात्रय मुळे, बाळकृष्ण लामतुरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कादंबरीची निर्मिती औरंगाबाद ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत उमरीकर यांच्या जनशक्ती वाचक चळवळीच्यावतीने करण्यात आली असून कादंबरीसाठी प्रस्तावना जेष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉ.यु.म. पठाण यांनी दिली असून या पुस्तकावर भागवत सांप्रदायाचे चैतन्य महाराज देगलुरकर यांनीही चिंतनपर लेख लिहिला आहे. ही कादंबरी जास्तीत जास्त वाचकासमोर जावी, या उद्देशाने तेर यात्रेच्या दरम्यान किंमतीमध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. संत गोरोबा काकांच्या सविस्तर जीवन चरित्र्याची निर्मिती केल्याबद्दल खा.डॉ. पद्मसिंह पाटील यांनी लेखक दीपक खरात यांचे अभिनंदन केले.