मुंबई -: जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येईल. मे महिन्यातील महिला लोकशाही दिन 20 मे 2013 रोजी होणार आहे. महिला लोकशाही दिन आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
जिल्हास्तरावर समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न, तक्रारी, अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळावा. महिलांना शासकीय यंत्रणेकडून सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, 10 वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे, पूर्व येथे दर महिन्याच्या तिस-या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येईल. समस्याग्रस्त महिलांनी विहित नमुन्यातील तक्रार अर्ज समितीकडे सकाळी 10 ते 11 या वेळेत सादर करावेत. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना विहित नमुन्यातील अर्ज व त्या संबंधीची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, टप्पा-2, पहिला मजला, आर.सी. मार्ग, चेंबूर मुंबई 400071. ई-मेल wcd_mumupanagar@rediffmail.com या पत्त्यावर उपलब्ध आहे, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष महिला लोकशाही दिन समिती यांनी कळविले आहे.