कळंब -: शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनोरमा भवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रारंभी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र दिनाचा विजय असो, कामगार दिनाचा विजय असो, अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकासाहेब मुंडे यांनी केले तर आभार पी.सी. मोरे यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकत्तेतर कर्मचारी उपस्थित होते.