कळंब -: कळंब तालुक्यातील दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला मोठा निधी उपलब्ध करुन मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी युवक कार्यकर्ते सुनिल रितापुरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कळंब तालुक्यातील दुष्काळाबाबत मंगरुळ तसेच सर्व गावांना दुष्काळी योजना लागू करावे. तालुक्यातील सर्व गावातील शेतक-यांच्या खात्यावर दुष्काळाची रक्कम वर्ग करण्यात यावी व हेक्टर 25 हजार रुपये देण्यात यावेत. यामुळे आर्थिकदृष्टया मागासलेल्या शेतक-यांना दिलासा मिळेल व येत्या जुन महिन्यात पेरणीची कामे योग्य पध्दतीने होतील. तसेच शेतक-याला पीक कर्ज माफी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.