कळंब -: तालुक्‍यातील हासेगाव (के) येथील बरमशेत येथे श्री पांडुरंग व पंचमुखी दक्षिणमुखी हनुमान मुर्तीच्‍या वर्धापन दिनानिमित्‍त अखंड हरिनाम सप्‍ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा चालू आहे. या अखंड हरिनाम सप्‍ताहात ह.भ.प. संदिपान महाराज कन्‍हेरवाडी, ह.भ.प. बंडातात्‍या कराडकर, ह.भ.प. शिंदे महाराज सोलापूर, दला महाराज अंबिरकर डिकसळ, राम महाराज जाट नांदुरकर, श्रीराम महाराज विडेकर, मेघराज महाराज आपेगांवकर, हरिपंडित महाराज हासेगांवकर तर शनिवार दि. 4 मे रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह.भ.प. संदिपान महाराज हासेगांवकर यांच्‍या अमृततुल्‍य काल्‍याचे किर्तन होईल व त्‍यानंतर डॉ. कल्‍याणराव रामभाऊ मिटकरी कन्‍हेरवाडीकर यांचा महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होईल. परिसरातील सर्व भाविक भक्‍तांनी या अखंड हरिनाम सप्‍ताहाचा लाभा घ्‍यावा, असे आवाहन श्री संत गोरोबा काका ट्रस्‍ट तेरचे उपाध्‍यक्ष ह.भ.प. हरिपंडीत महाराज हासेगांवकर यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी भागवत तोडकर, रामानंद शिंदे, शिवानंद शिंदे, शिवाजी मुळे, सुरेश मुळे, विलास पाटील आदीजण परिश्रम घेत आहेत.
 
Top