कळंब -: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रदेश कार्यकारणीवर उस्मानाबाद जिल्ह्यातून सोमनाथ टकले, अशोक जाधव व भक्तराज दिवाणे यांची निवड करण्यात आल्याची माहिती संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय महामंडळ सभा शिक्षक नेते शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नाशिक येथे संपन्न झाली. या राज्यस्तरीय कार्यकारणीत उस्मानाबाद जिल्ह्यातून प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ टकले (भूम), अशोक जाधव (लोहारा) तर प्रदेश चिटणीस म्हणून भक्तराज दिवाणे (वाशी) यांची पुढील तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.
यावेळी अ.भा. प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष एस.डी. पाटील, प्रदेशाध्यक्ष राजाराम वरूटे, प्रदेश कार्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, प्रदेश सरचिटणीस केशव जाधव, प्रदेश कोषाध्यक्ष अंबादास वाझे आदी मान्यवर उपस्थित होते. या निवडीबद्दल बिभीषण पाटील, एल.बी. पडवळ, सुरेश वाघमोडे, संतोष देशपांडे, मनोज चौधरी, अनिल बारकुल, राजेंद्र बिक्कड, निळकंठ इटकरी, बाळासाहेब पुजारी, दत्ता पवार, राजेंद्र गव्हाणे, विक्रम पाटील, डी.डी. कदम, धनाजी मुळे, संतोष मोळवणे, बाळासाहेब कुटे, सुदर्शन जावळे, चंद्रकांत कदम, विरभद्र कवठे, प्रविण स्वामी, महेबुब काझी यांनी अभिनंदन केले आहे.