विद्यालयीन व महाविद्यालयीन मुलींना उस्मानाबाद येथील  वसतीगृह प्रवेशासाठी आवाहन 

उस्मानाबाद :- मागासवर्गीय (मुलींचे) शासकीय वस्तीगृह,उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रासमोर कार्यरत आहे. या वसतीगृहात सन 2013-14 या शैक्षणिक वर्षाकरीता विद्यालयीन व महाविद्यालयीन विभागातील  विद्यार्थीनींना  प्रवेश देण्यात येणार आहे.इच्छुक  शालेय विभागाच्या विद्यार्थीनींनी प्रवेशासाठी 15 मे पुर्वी किंवा निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत  तर  महाविद्यालयीन विभागातील विद्यार्थीनींनी  निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत भरलेले प्रवेश अर्ज सादर करावेत.
    वसतीगृहात विद्यार्थीनींना वसतीगृहात निवास,भोजनाची ,स्टेशनरी साहित्य, गणवेश आदि विनामुल्य पुरविण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक साहित्य,अंथरुण, पांघरुण आदि साहित्य पुरवून निर्वाह भत्ता दरमहा 700 रुपये देण्यात येणार आहे.
    प्रवेश अर्ज विनामुल्य देण्यात येणार असून गरजुंनी अधिक माहितीसाठी वसतिगृह अधिक्षकांशी  कार्यालयीन वेळेत संपर्क साधावे असे आवाहन गृहपाल, मागासवर्गीय (मुलींचे ) शासकीय  वसतीगृह, उस्मानाबाद यांनी केले आहे.   

विद्यालयीन व महाविद्यालयीन मुलींना तुळजापूर येथील शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी आवाहन 

उस्मानाबाद :- तुळजापूर येथे मागासवर्गीय व आर्थिक द्ष्टया मागासवर्गीय (मुलींचे) शासकीय वस्तीगृह, तुळजापूर येथे  कार्यरत आहे. या वसतीगृहात सन 2013-14 या शैक्षणिक वर्षाकरीता विद्यालयीन व महाविद्यालयीन विभागातील  मुलींना  प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक शालेय विभागाच्या विद्यार्थींनींनी प्रवेशासाठी 15 मे पुर्वी किंवा निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत  व महाविद्यालयीन विभागातील  विद्यार्थींनीसाठी निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत प्रवेश अर्ज घेवून जावे व परिपुर्ण अर्ज भरुन सादर करावेत.
    वसतीगृहात निवास, भोजनाची ,स्टेशनरी साहित्य, गणवेश आदि विनामुल्य पुरविण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक साहित्य,अंथरुण, पांघरुण आदि साहित्य पुरवून निर्वाह भत्ता दरमहा 600 रुपये देण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज विनामुल्य देण्यात येणार असून गरजुंनी अधिक माहितीसाठी वसतिगृह अधिक्षकांशी  कार्यालयीन वेळेत संपर्क साधावे,  असे आवाहन गृहपाल, मागासवर्गीय  व आर्थिकद्ष्टया मागासवर्गीय (मुलींचे) शासकीय वस्तीगृह, तुळजापूर यांनी केले आहे.
 
Top