उस्मानाबाद :- राज्य परिवहन महामंडळ, उस्मानाबाद विभागाकडून गर्दीचा हंगाम व लग्न सराई असल्यामुळे  वाहतूकीत प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने  वाहतूकीसाठी जादा बसेसची सुविधा खालील मार्गावर जादा वाहतूकीची सुविधा  करण्यात आली आहे. तरी  प्रवाशांनी या सुसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक, उस्मानाबाद यांनी केले आहे.
    उस्मानाबाद आगार - उस्मानाबाद ते पुणे शि. न. सुटण्याची वेळ  12 वाजता,  परतीला सुटण्याची वेळ रात्री 9-45 वाजता. उमरगा आगार - उमरगा ते पिंपरी चिंचवड मार्गे सोलापूर उमरगा येथून सुटण्याची वेळ 7-30 ,8-30,9-30, पिंपरी चिंचवड येथून सुटण्याची वेळ संध्याकाळी 7-30, रात्री 8-45 व 9-45 वाजता.भूम ते पिंपरी चिंचवड मार्गे अहमदनगर भूम येथून सुटण्याच्या वेळा 7-30, 15-00,  पुणे येथून सुटण्याची वेळ संध्याकाळी 17 वा. व रात्री 9 वाजता. कळंब ते पिंपरी चिंचवड मार्गे बार्शी कळंब येथून सुटण्याची वेळ रात्री 9-30 वाजता तर पिंपरी चिंचवड येथून सुटण्याची वेळ रात्री 9-30 वाजता. परंडा ते पिंपरी चिंचवड मार्गे गोंडरे,करमाळा- कळंब येथून सुटण्याची वेळ सकाळी 9 वाजता तर पिंपरी चिंचवड येथून सुटण्याची वेळ सकाळी 6-15 वाजता.           
 
Top