उस्मानाबाद :- उस्मानाबाद तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना व त्यांच्या कुटुंबियांना पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले.
बरमगाव (ता. उस्मानाबाद) येथे वीज पडुन मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारस श्रीमती महानंदा पोपट घोडके यांना दिड लाख रुपये, दिगंबर गंगाधर पाटील, रा.कोंड यांना त्यांचा बैल मृत्युमुखी पडल्याने 15 हजार रुपये, पाडोळी (आ) येथील धनंजय किसन पवार यांना त्यांची गाय या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडल्याने 16 हजार 400 रुपये,इर्ला येथील मोहन बिटे यांना त्यांच्या 10 मेंढया मयत झाल्याने 16 हजार 500 रुपये आणि सुंभा येथील महेश मासाळ यांना त्यांची गाय मृत्युमुखी पडल्याने 16 हजार 400 रुपयांची मदत यावेळी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.

यावेळी अप्पासाहेब पाटील, मधुकर तावडे, विश्वास शिंदे, उपविभागीय
अधिकारी प्रशांत सुर्यवंशी, तहसीलदार अभिजीत पाटील, संबंधित गावांचे तलाठी उपस्थित होते.