नळदुर्ग -: इयत्‍ता दहावीच्‍या परीक्षेत धरित्री विद्यालयाची विद्यार्थिनी कु. सोनाली एकनाथ शिरगुरे हिने 92.73 टक्‍के गुण मिळवून प्रथम आली असून धरित्री विद्यालयाचा निकाल 97.82 टक्‍के इतका लागला आहे. तर भक्‍ती अनिल पाटील व हर्षल प्रभाकर जाधव यानी 89.09 टक्‍के गुण घेवून द्वितीय क्रमांकाने उत्‍तीण झाले असून कदम सौरभ याने 87.45 टक्‍के घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे. कु. सोनाली शिरगुरे हिने विद्यालयात व नळदुर्ग केंद्रात प्रथम येण्‍याचा मान पटकाविला आहे. सर्व यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचे संस्‍थेचे अध्‍यक्ष बाबुराव चव्‍हाण, उपाध्‍यक्ष प्रा. नरसिंग माकणे, सचिव अँड. सयाजी शिंदे, मुख्‍याध्‍यापक सुरेश कांबळे यांच्‍यासह संस्‍थेचे सदस्‍य, शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.
 
Top