नळदुर्ग  -: येथील सरकार नानीमॉं (हजरता सय्यदा खैरुन्‍नीसा बेगम साहेबा) यांच्‍या 38 व्‍या उरुसास शनिवार रोजी संदल मिरवणूकीने सुरुवात झाली. हे उरुस तीन दिवस चालणार असून त्‍यानि‍मित्‍त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. उरुसानिमित्‍त नानीमॉं दर्गाहावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्‍यात आली आहे.
        नळदुर्ग येथील सरकार नानीमॉं (हजरता सय्यदा खैरुन्‍नीसा बेगम) यांच्‍या उरुसानिमित्‍त मोठ्या उत्‍साहाने शनिवार रोजी संदल काढण्‍यात आली. सुरुवातीस रिजवानउल्‍ला काझी यांच्‍या पूजा करुन महाप्रसादाचे वाटप करण्‍यात आले. त्‍यानंतर ही संदल त्‍यांच्‍या घरातून निघून किल्‍लागेट, क्रांती चौक, चावडी चौक, भवानी चौक या मार्गे नानीमॉं दर्गाह येथे रात्री दहा वाजता ही संदल ढोली, बाजा, वाद्याच्‍या गजरात मोठ्या उत्‍साहाने पोहोचली. यावेळी यथोचित पूजाअर्चा करुन उपस्थित भक्‍तांना महाप्रसादाचे वाटप करण्‍यात आले.
यावेळी माजी आमदार युनुस शेख, दस्‍तगीर मुच्‍छाले, नियामत हाफीसाब, शफी शेख, सलीम शेख, माजी नगरसेवक शब्‍बीर कुरेशी, पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख, नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सावकार, इम्रान काझी, विजय पिस्‍के, हिंगमिरे, शोएब चिश्‍ती, इस्‍माईल मुच्‍छाले यांच्‍यासह नानीमॉंचे भक्‍त मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
रविवार रोजी दुपारी दोन वाजता चिराग रोशनाईंचा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी दुपारी चार वाजता शाकेर-जाकेर कव्‍वाल व मुंबईच्‍या कॅसेट सिंगर परवीन शहजादी कव्‍वाला यांच्‍यात कव्‍वालीचा भव्‍य मुकाबला होणार आहे.
 
Top