पुणे : पुणे विभागीय माहिती कार्यालयातील हंबीरराव देशमुख यांची पदोन्नतीने नागपूर येथे माहिती अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल पुणे विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने उपसंचालक (माहिती) वर्षा शेडगे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करुन निरोप देण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, सहाय्यक संचालक युवराज पाटील, माहिती अधिकारी दिलीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.
उपसंचालक वर्षा शेडगे यांनी देशमुख यांच्या पदोन्नतीबाबत अभिनंदन करुन आजवरील त्यांच्या उत्कृष्ट कार्याबाबत गौरव केला. श्रीमती शेडगे म्हणाल्या, शासकीय सेवेप्रती निष्ठा, आपले काम चांगल्याप्रकारे पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी आणि माणसं जोडणा-या स्वभावामुळे श्री. देशमुख माहिती खात्यात सुपरिचित आहेत. शासकीय सेवा बजावतांना प्रशासकीय कारणास्तव कामकाजात होणारे बदल प्रत्येकाने नवे आव्हान म्हणून स्विकारायला हवेत.
सत्काराला उत्तर देताना देशमुख यांनी 30 वर्षांच्या सेवेतील विविध अनुभव सांगितले. माहिती खात्याच्या कार्यपध्दतीत संगणकामुळे होत गेलेले बदल, कार्यपध्दती, वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेली शाबासकी अशा कडू- गोड आठवणींचे त्यांनी कथन केले. शासकीय काम करताना होणारी 'बदली' नवी संधी म्हणून स्विकारा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जुलै 2013 मध्ये थायलंड येथे होणा-या कराटे-बॉक्सिंग-नानमुडो आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मेघना हंबीरराव देशमुख हिची निवड झाल्याबद्दल उपसंचालक वर्षा शेडगे यांनी तिचा गौरव केला. पुणे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, माहिती अधिकारी दिलीप कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. युवराज पाटील यांनी आभार मानले.