उस्मानाबाद :- जलसंधारण विभागामार्फत दुष्काळावर मात करण्याच्या महत्वांकांक्षी कार्यक्रमांअंतर्गत भूम तालुक्यातील बावी (भवानवाडी) येथील साखळी पध्दतीच्या सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांचे लोकार्पण भूमचे आमदार तथा गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राहूल मोटे यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, जिल्हा कृषी अधीक्षक शंकरराव तोटावार, कार्यकारी अभियंता, (लघुपाटबंधारे) करिमुंगी एन. आर, गटविकास अधिकारी मुल्ला, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या जलसंधारण विभागामार्फत भूम तालुक्यात साखळी पध्दतीचे सिमेंट काँक्रीट बंधारे 59 मंजूर असून त्यापैकी 50 बंधाऱ्याची कामे पूर्ण झाली असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तरचे) करीमुंगी यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.
आ. मोटे म्हणाले की, जलसाठ्याची पातळी अत्यंत खालावली असून त्यामुळे या बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्यामुळे आजूबाजूच्या विहीरींना भविष्यात पाणी राहू शकेल व तयामुळे शेतकऱ्यांना उत्तम प्रकारे पिके घेवून विकास साधता येईल. या कामासाठी शासनाने आठ कोटी रुपये मंजूर केले असून त्यामधून ही कामे केली जात आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या बंधाऱ्यांची खोली वाढविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मुख्य कार्यकारी हरिदास यांनी ग्रामपंचायतीने थकीत बील भरण्यासाठी ग्रामपंचायतीने 33 टक्के व उर्वरीत 67 टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडून दिली जाणार असल्याचे सांगून ग्रामपंचायतींने याचा लाभ घेतला पाहिजे. या तालुक्यात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचे कामे उत्तम झाल्याने या बंधाऱ्यात पावसाचे पाणी वाया न जाता पाणी साठले जाईल व आजु बाजूंच्या विहीरींच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल, आणि शेतकऱ्यांना पीके घेणे सुलभ होईल, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी भूम पंचायत समितीचे सभापती अण्णासाहेब भोगीले, उपसभापती गव्हाणे, वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. रेड्डी, लघुपाटबंधारे स्थानिक स्तर उपविभागीय अधिकारी हक्कानी इ. झेड, देशमुख एस. एम, शाखा अभियंता कात्रे आर. आर, काकडे जि. व्ही, रियाझ पटेल, तालुका कृषी अधिकारी नाईकवाडी, वाघमारे ए. आर. आदिंसह लोकप्रतिधि, कार्यकर्ते, ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.