बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: दीड वर्षापासून बंद असलेली मांडेगाव आणि देवळाली मार्गे भूमला जाणारी बससेवा पूर्ववत सुरु झाल्‍याने ग्रामस्‍थांच्‍या चेह-यावर आंनद दिसू आला.
    रस्‍त्‍याच्‍या प्रश्‍नामुळे बंद पडलेल्‍या बसचा गैरफायदा घेत मड्याच्‍या टाळूवरचे लोणी खाणा-या अवैध प्रवाशी वाहतुकदारांनी सर्वसामान्‍य ग्रामस्‍थांना पिळून टाकले. तीन सीटच्‍या जागेवर सात ते आठ जणांना बळजबरीने बसवून लोकांच्‍या अनेक दिवस जीवाशी खेळ केला. लोकांची अडली नडली कामे, रात्री अपरात्री दवाखान्‍यासाठी अथवा महत्‍त्‍वाच्‍या कामासाठी शहरात जाण्‍यासाठी अशा लोकांच्‍या हातपाया पडण्‍याशिवाय मार्ग नव्‍हता.
    मागील पंधरा दिवसापूर्वी बनविलेल्‍या रस्‍त्‍याची अंत्‍यत दयनीय अवस्‍था झाली तरीही राजकीय पुढा-यांनी लक्ष न दिल्‍याने मांडेवाग व देवळाली येथील ग्रामस्‍थ हैराण झाले. देवळाली ते मांडेगाव सात किलोमीटर तसेच मांडेगाव ते बार्शी दहा किलोमीटर असा एकूण सतरा किलोमीटरच्‍या रस्‍त्‍याचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी सर्व राजकीय नेते असमर्थ ठरल्‍याने या ग्रामस्‍थांना सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मिरगणे यांनी सर्व यंत्रणा व कच्‍चा माल देवून केवळ ग्रामस्‍थांनी श्रमदान केल्‍यास रस्‍ता तात्‍काळ तयार करू, असा विचार मांडला. ग्रामस्‍थांनीही तात्‍काळ होकार दिल्‍याने या रस्‍त्‍याचे काम सुरु करण्‍यात आले.
    शुक्रवारी बससेवा पूर्ववत सुरु होताना ग्रामस्‍थांसह उद्योजग राजेंद्र मिरगणे, बार्शी आगाराचे वाहतूक नियंत्रक वाय.बी. कुलकर्णी, मांडेगावचे सरपंच भिमराव दळवी यांच्‍यासह प्रमुख मान्‍यवराचा शाल, श्रीफळ, मानाचा फेटा व पुष्‍पगुच्‍छ देवून सत्‍कार करण्‍यात आला.
 
Top