बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: कसबा प्रतिष्ठान, स्‍वप्‍नील मोहिते मित्र परिवारच्‍यावतीने युवा नेते अभिजित राऊत यांच्‍या 24 व्‍या वाढदिवसानिमित्‍त आयोजित केलेल्‍या क्रिकेट बॉल क्रिकेट स्‍पर्धेच्‍या पारितोषिक वितरणाचा समारंभ तसेच अभिजित राऊत यांचा भव्‍य नागरी सत्‍कार करण्‍यात आला. 
     यावेळी कॉंग्रेसचे शहराध्‍यक्ष विजय राऊत, भिमाजी पवार, युवक कॉंग्रेसचे शहराध्‍यक्ष काका फुरडे, रणवीर राऊत, स्‍वप्‍नील मोहिते, नगरसेवक दिपक राऊत, नगरसेवक महेदिमियॉं लांडगे, बाळासाहेब पवार, रितेश आण्‍णा वाघमारे, आनंद माने, अर्जुन नागणे, सुरज राऊत, सोनू जगताप आदी उपस्थित होते.
    क्रिकेट स्‍पर्धेत प्रथम शंभूराजे क्रिकेट क्‍लब, द्वितीय आनंद एलेव्‍हन क्रिकेट क्‍लब, तृतीय गणेश एलेव्‍हन क्रिकेट क्‍लब यांना साई प्रतिष्‍ठानच्‍यावतीने पारितोषिके देऊन गौरविण्‍यात आले. ग्रामदैवत श्री भगवंताचा आशिर्वाद घेवनू कार्यक्रमाच्‍या ठिकाणी वाजत गाजत फटाक्‍यांच्‍या आतिषबाजीत भव्‍य मावळ्यांच्‍या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला.
    कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी निलेश ढगे, अभिजीत जत्‍ती, वैभव शिंदे, सौरभ राऊत, अमोल फरताडे, विक्‍की दांडगे, सचिन पवार, अक्षय पाटील यांच्‍यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी परिश्रम घेतले.
 
Top