उस्मानाबाद –: हिरोहोंडा स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल चोरुन वाशी तालुक्यातील दहीफळ येथील वन विभागाच्या गायरानात गेला असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक पथकास मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मधुकर घायाळ, तानाजी माळी, मोईज काझी, नाना भोसले, संजय पानसे, वाहेद मुल्ला, सुनिल कोळेकर, सचिन कळसाईन, नज्जू पठाण यांनी गुरुवारी दुपारी दहीफळ (ता. वाशी) शिवारात सापळा रचून सुनिल बप्पा काळे (रा. सोन्नेवाडी, ता. वाशी) यास हिरोहोंडा स्प्लेंडर मोटारसायकल किंमत 35 हजार रुपये मुददेमालासह पकडले. त्यास सदरील मोटारसायकलबाबत विचारणा केली असता, त्याने बीड जिल्हयातून मोटारसायकल चोरी करुन आणल्याचे कबूल केले असून सदरील मोटारसायकल व आरोपी सुनिल काळे यास पुढील कार्यवाहीसाठी वाशी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. आरोपी सुनिल काळे हा मोटारसायकल चोरी करण्याच्या सवयीचा आहे.