उस्मानाबाद : जिल्हा दरोडा प्रतिबंधक पथक हे भूम, वाशी भागात घरफोडीतील आरोपींचा शोध घेत फिरत असताना तेरखेडा येथे आले असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गंपू शिवराम काळे (वय 50 वर्षे, रा. तेरखेडा) याने भूम पोलीस ठाण्याच्या हददीत चोरी करुन 19 वर्षापासून फरार आहे व तो लपून छपून तेरखेडा शिवारात फिरत असल्याची माहिती मिळताच उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गोमारे, पोहेकॉ मधुकर घायाळ, तानाजी माळी, मोईज काझी, नाना भोसले, संजय पानसे, वाहेद मुल्ला, सुनिल कोळेकर, सचिन कळसाईन, प्रफुल ढंगे, काका शेंडगे यांनी गुरुवार रोजी तेरखेडा शिवारात सापळा रचून 19 वर्षापासून फरार असलेला व कलम 82 प्रमाणे जाहिरनामा निघुन देखील सापडत नसलेला आरोपी गंपु शिवराम काळे यास अटक करुन पुढील कार्यवाहीसाठी भूम पोलीस स्टेशन येथे हजर केले असून त्याच्यावर यापुर्वी चोरी, घरफोडी, जबरी चोरी इत्यादी गुन्हे दाखल आहेत.
 
Top