बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर)  -: उत्तराखंडमधील श्रीक्षेत्र केदारनाथ यात्रेसाठी गेलेल्या बार्शी तालुक्यातील पाथरी येथील सतराजण बेपत्ता झाले असून दि. 15 जूनपासून त्यांच्याशी कसलाही संपर्क झाला नसल्याचे त्यांचे नातेवाईक गणेश गायकवाड यांनी सांगितले आहे. नैसर्गिक आपत्ती होऊन अनेकजणांचे जीव धोक्यता आल्यची बातमी वृत्तवाहिन्यांवर दिसल्यापासून त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अदयापर्यंत त्यांच्याशी कसलाही संपर्क न झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देवून मदतकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
    गायकवाड  परिवारातील परिचंद, अर्जुन, विजया, नानासाहेब, महानंदा, दामोदर, मंदोरी, सुवर्णा, मधुकर व उल्पाबाई विधाते, बाबासाहेब गव्हाणे, पडवळ परिवारातील सचिन, कमल, रामभाऊ, कबाई, पुष्पा असे सतराजण दि. 5 जून रोजी सोलापूर येथून रेल्वेने चारधाम यात्रेला निघाले होते. काशी विश्वनाथ दर्शनानंतर अयोध्यामार्गे गंगात्रेी, यमनोत्री, बद्रीनाथचे दर्श करुन केदारनाथला दर्शनासाठी निघाले. त्यांचा नातेवाईकांशी दि. 15 जूनच्या रात्री साडे सात वाजता शेवटचा संपर्क झला होता. यावेळी केदारनाथपासून 25 किलोमीटर अंतरावर असल्याचे तसेच मुसळधार पावसामुळे मुक्काम झाल्याचे व पुढे जावू शकत नसल्याचे गायकवाड यांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. यानंतर दि. 16 जून रोजी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अदयापपर्यंत कसलाही संपर्क होत असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. शासनाच्यावतीने योग्य ते प्रयत्न करुन संपर्क करुन देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
 
Top