बार्शी  (मल्लिकार्जून धारुरकर) -: विशेष तंटामुक्त गावचा पुरस्कार मिळविलेल्या बार्शी तालुक्यातील पानगांव या गावातील महिलांनी मागील अनेक वर्षापासून दारु विक्रेत्यांमुळे त्रास होत असल्याची तक्रार केली आहे.
    सदरच्या बेकायदा दारुकिव्रीच्या विरोधात गावातील नागरीक व महिलांनी तंटामुक्त समितीकडे वेळोवेळी तक्रार केली. सदरच्या तक्रारीची दखल न घेतल्याने वैराग पोलिसांनी तक्रार दिली. परंतु तरीही जाणीवपूर्वक डोळेझाक होत असल्याने गावातील महिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. सदरच्या तक्रारीत दारु विक्रेत्यांकडून तसेच दारु पिणा-यांकडून महिलांची छेडछाड, शिवीगाळ व दमदाटी होत असल्याने गावतील दारुमुळे गंभीर समस्या निर्माण झाल्याचे‍ निवेदनात म्हटले आहे. पोलिसांकडून सदरच्या बेकायदा दारु विक्रेत्यांना एकप्रकारे अभय मिळत आहे. शेतात काम करायला जाणा-या शेतक-यांना घरात येवून तसेच प्रात:विधीसाठी जाणा-यांच्या हातात दारुच्या बाटल्या दिल्या जात आहेत. तंटामुक्त गाव घोषित केल्याने तंटामुक्त समितीही सदरच्या बेकायदा व्यवसायांविरोधात ठोस पावले उचलत नसल्याने सदरच्या कृत्य करणा-यांचा आत्मविश्वास बळावला आहे. सदरच्या तक्रारीची दखल लवकर न घेतल्यास गावातील महिला आंदोलन छेडणार असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
    सोमवारी सकाळी तंटामुक्त समितीच्या बैठकीत महिला तक्रार घेवून गेल्यावर महिलांसमोर दारु विक्रेत्यांनी शिटया वाजवून लज्जास्पद वर्तन केले. काही जणांनी टाळया वाजवू न सदरच्या महिलांना मानसिक त्रास देण्याचा प्रयतन केला. सदरच्या प्रकारने महिलांनी एकत्रपणे रस्त्यावर उतरुन गावातील दारुविक्री दुकानावर मोर्चा नेत दारुच्या बाटल्या फोडण्याचे ठरवले. परंतु सदरची कृती होण्याअगोदरच दारु विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद करुन तेथून पळ काढला.
 
Top