नळदुर्ग -: अणदूर (ता. तुळजापूर) येथील सावली बचत गटाच्यावतीने बुधवार दि. 26 जून रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन "विदयार्थी गुणगौरव" समारंभ नळदुर्ग येथे आयोजित करण्यात आले आहे.
    सामाजिक न्यायाचे कैवारी, आरक्षणाचे जनक, संपूर्ण देशाला मोफत व सक्तीच्या शिक्षणाची गरज असल्याचा आग्रह धरणारे कर्मयोगी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा दि. 26 जुन हा जन्म दिवस म्हणजे "सामाजिक न्यायदिन" या निमित्ताने आर्थिक व सामाजिक कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील सावली (पुरुषगट) बचतगटाच्यावतीने बुधवार दि. 25 जून रोजी दुपारी तीन वाजता नळदुर्ग येथील जि.प. प्रशाला नवीन इमारत, बसस्थानकासमोर "विदयार्थी गुणगौरव" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शब्बीरअली सय्यद सावकार तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर पंचायत समितीचे सभापती मनिषा पाटील, नळदुर्गचे उपनगराध्यक्ष सौ. अपर्णा बेडगे, प्राचार्य डॉ.सौ. अनिला मुदकण्णा, गटशिक्षणाधिकारी सविता भोसले, पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख, विस्ताराधिकारी एस.आर. नागमोडे आदीजण उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास विदयार्थी, पालकासह नागरिकानी उपस्थित राहण्याचे आवाहन सावली बचत गटाचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे, सचिव दयानंद काळुंके यानी केले आहे.
 
Top