प्रतिकात्मक फोटो |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दक्षिणेकडे जाणा-या मार्गावर सोमवारी हा अपघात घडला. त्यावेळी निधी या परिसरातील 'मिकी मेहता 360' या व्यायामशाळेतून घरी परतत होती, अशी माहिती माटुंगा पोलिसांनी दिली. रस्ता ओलांडत असताना निधीने कानात इअरफोन घातले होते. त्यामुळे रस्त्यावरुन येणा-या बसचा आवाज तिला आला नाही आणि हा अपघात घडला.
याप्रकरणी बसचालक हरिश्चंद्र आरगाडे (वय 49) याला निष्काळजीपणाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. हा अपघात घडला, तेंव्हा ती बस अहमदनगर येथून येत होती. निधीला आधी एका बेस्ट बसने धडक दिली, त्यानंतर आपली बस तिला धडकल्याचे हरिश्चंद्रने पोलिसांना सांगितले.
मदतीला कोणीच नाही
अपघातानंतर जखमी अवस्थेत निधी बराच वेळ रस्त्यावर पडून होती. पण आजूबाजूने जाणा-यांनी तसेच गाडीचालकाने तिला मदत केली नाही. अखेर एका मोटारसायकलस्वाराने याप्रकाराची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यामुळे अपघातानंतर वीस मिनिटानंतर तिच्यापर्यंत मदत पोहोचू शकली. तिला शीवच्या लोकमान्य टिळक रूग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरानी तपासणी करुन तिला मृत घोषित केले.