बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: मौजे शेंदरी (ता. बार्शी) येथील ग्रामपंचायतीने ठराव करुनही दारुबंदी होत नाही. गावातील पाणी पुरवठ्याच्या विहीरीच्या कडेला अतिक्रमणे झाल्याने तसचे यामध्ये त्यांच्याकडून दररोज विहीरीत कचरा पउत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बार्शी कुर्डूवाडी रोडवरील मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेंदरी गावाची लोकसंख्या सुमारे 4 हजार व 700 च्या आसपास घरे आहेत. ग्रामपंचातीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे व कॉंग्रसचे प्रत्येकी तीन सदस्य व इतर तीन सदस्य निवडून आल्याने संमिश्र राजकीय परिस्थिती होती. गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी विविध स्त्रोत उपलब्ध असून दुष्काळी परिस्थितीत मुख्य चौकात मारुती मंदिराजवळ असलेल्या गाव विहीरीत टँकरद्वारे येणारे पाणी विहीरीत टाकण्यात येते. नागरीक त्यावरुन पाणी उपसा करुन घेऊन जात आहेत.
विहीरीच्या कडेला गावातील व्यावसायिक टप-यांचे अतिक्रमण झाल्याने विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. शेजारी मटका व्यावसायिक, चहाचे कँटीन, हॉटेल, पत्त्याचा क्लब, टेलर, साईकल दुकान, दारु विक्री, कटींग सलून, इत्यादी व्यवसाय सुरु आहेत. सदरच्या व्यावसायिकांकडून अथवा त्यांच्याकडे येणा-या ग्राहकांकडून चहाचे प्लास्टीकचे रिकामे ग्लास, दारुच्या बाटल्या, जुगारातील पत्ते, सलून मधून येणारे केस, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, तंबाखूच्या पुडया, गुटखा पुडया तसेच त्यांच्याकडून यात थुंकणे यासारखे प्रकार घडत आहेत. सदरच्या विहीरीवर पाणी भरण्यासाठी येणा-या महिलांकडे काही दारुडे व जुगारी लोक साततत्याने निर्लज्जपणे पाहत बसतात व कोणी काही बोलल्यास शिव्या देतात व भांडणे काढतात.
सदरच्या बाबीला गांभिर्याने घेत गावातील ग्रामपंचायतीने ठराव घेऊन या ठिकाणचे अतिक्रमण काढावे, असा ठराव करुन तहसिलदार व बांधकाम विभाग यांच्याकडे विनंती अर्ज केला आहे. सदरच्या व्यावसायिकांनी माहिती संबंधित पोलीस ठज्ञण्याला कळविण्यात आली आहे. दारुबंदीचा ठराव घेवून होत असलेल्या व्यवसायाची कल्पना व तक्रार देवूनही जाणीवपूर्वक घेतल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.