राज्यातील पाणीटंचाई कायमस्वरुपी संपविण्यासाठी राज्य शासनाने सिमेंटचे पक्के दगडी नाला बांध बांधण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम अवर्षणप्रवण व दुष्काळग्रस्त भागात हाती घेतला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: यासाठी पुढाकार घेतला. जलसंधारणमंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी हे काम वेळेवर पूर्ण होईल यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला. राज्यातील ६ जिल्ह्यातील १५ तालुक्यात ४७४ गावात १४२३ सिमेंट नाला बांध बांधण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्याची निवड त्यासाठी करण्यात आली होती. भूम तालुक्यात एक जून २०१३ रोजी सिमेंट नाला बांध लोकार्पण सोहळा पार पडला. तर राज्यात उर्वरित ठिकाणी ९ जून रोजी लोकार्पण सोहळा होत आहे. त्यानिमित्त माहिती देणारा हा लेख….
आपल्या राज्यात सन २०११ व २०१२ मध्ये खूपच कमी पाऊस पडला. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेली. सन २०११ मध्ये भूगर्भाची पाणी पातळी २ मीटर पेक्षा खाली गेलेल्या १५ तालुक्यात साखळी सिमेंट नाला बांध बांधण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला. या १५ तालुक्यांसाठी शासनाने १५० कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करुन दिला.
सिमेंट नाला बंधारे हा सातत्यपूर्ण चालणारा कार्यक्रम नाही हे जरी खरे असले तरी ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणात आहे, तेथे त्वरीत पाण्याचा साठा निर्माण होण्यास मदत होतो. विदर्भासारख्या भागात नाबार्डच्या सहकार्याने ९ हजार १४४ सिमेंट नाला बांध बांधण्यात आले. त्याचे चांगले परिणाम त्या भागात दिसून येत आहेत. त्यामुळेच राज्य शासनाने अवर्षणप्रवण क्षेत्रात अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याचे ठरविले.
सिमेंट नाला बंधा-याचे फायदेही अनेक आहेत. एका बंधाऱ्यामुळे ४ हेक्टर जमीन ओलिताखाली येते. एका वेळी १० हजार घन मीटर पाणी साठा होतो. तसेच पावसाळ्यामध्ये ३ वेळा पाणी भरते. सर्वात महत्वाचे म्हणजे सिमेंट नाला बंधाऱ्याजवळील उद्भव आवर्धीत होऊन त्याचा फायदा स्थानिक नागरिकांना आणि परिसराला होतो. यावर्षी राज्यात १४२३ सिमेंट नाला बंधारे पूर्ण झाले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात त्यामध्ये पाणी अडल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचे दृश्य परिणाम दिसणार आहेत. बंधाऱ्यांमुळे पाणीसाठा होऊन तो वापरासाठी उपलब्ध होणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात भूम तालुक्यातील २१ गावांची निवड गाव निवड समितीमार्फत करण्यात आली. तेथे ५९ सिमेंट नाला बांध प्रस्तावित करण्यात आले. त्यापैकी ४९ कामे पूर्ण करण्यात आली तर ६ कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित ४ सिमेंट नाला बंधारे कामे निविदा प्रक्रिया अवस्थेत आहेत.
भूम तालुक्यातील या कामासाठी ६ कोटी ३९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर येथील काही कामे कृषी विभागामार्फत करण्यात आली तर उस्मानाबादसह सोलापूर तसेच सांगली व आहमदनगरमधील काही सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) विभागामार्फत करण्यात आली.
सिमेट नाला बंधाऱ्यांची कामे परिणामकारक व्हावीत यासाठी नाल्यावर पुरेशा अंतरावर साखळी पद्धतीने बांधकाम करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. ही कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी व्हायब्रेटर व मिक्सर वापर करण्याच्या आणि २१ दिवस क्युरिंग करताना गोणपाटाचा वापर करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. अतिशय महत्वाकांक्षी असा हा कार्यक्रम पूर्ण झाला असला तरी जलसंधारणाचा एक भाग म्हणून खोल नाल्यावर सिमेंट नाला बंधारे बांधण्याचा हा कार्यक्रम केंद्र शासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणार आहे.
रविवार, दि. ९ जून रोजी राज्यात उर्वरित ठिकाणी एकाच वेळी हा लोकार्पणाचा कार्यक्रम होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात १ जून रोजी या सिमेंट नाला बंधा-याचे लोकार्पण करण्यात आले. आगामी काळात पाणीसंकटाचा सामना करावा लागू नये म्हणून अशा प्रकारच्या सिमेंट नाला बंधा-यांची उपयुक्तता अधिक आहे.

* दीपक चव्हाण
प्र. जिल्हा माहिती अधिकारी,
उस्मानाबाद
प्र. जिल्हा माहिती अधिकारी,
उस्मानाबाद