शांतीस्थळ, अक्कलकोट -: बंजारा समाज सर्वत्र देशभर विखुरलेला असून थंडी, ऊन, वा-यामध्ये कष्ट करणारा हा समाज विकासापासून वंचित असून समाजाचे दैवत सेवालाल महाराज यांचे विचार व आदर्श जोपासले आहे. समाजाच्या सर्वांगिण विकासाकरीता व उन्नतीकरीता देशातील तमाम बंजारा बांधव संघटित होवून अन्याय, अत्याचाराविरूद्ध लढा देण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन करताना कर्नाटक राज्यातील बंजारा समाजाचे धर्मगुरु जुगनू महाराज यांनी राष्ट्रीय बंजारा साहित्य परिषदेच्या उदघाटनप्रसंगी सांगितले.
माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जन्मशताबादीनिमित्त डिग्गेवाडी (ता. अक्कलकोट) येथील शांतीस्थळावर राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे दि. 7 जून रोजी संत धावजी बापू महाराज द्वितीय पुण्यतिथी व राष्ट्रीय बंजारा साहित्य परिषद आणि बंजारा समाजाचे स्नेहमेळावा व सन्मान, साहित्य प्रकाशन सोहळा यासह भरगच्च कार्यक्रम देशभरातील साहित्यिक, लेखक, कवी, समाजाचे धर्मगुरु यांच्यासह अनेक प्रतिष्ठित समाज बांधवाच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार रणजितसिंह मोहितेपाटील, प्रा. मोतीराज राठोड, माजी गृहमंत्री सिध्दराम म्हेत्रे, अक्कलकोटचे आमदार सिद्रामप्पा पाटील, सोलापूर जि.प. सदस्य उमाकांत राठोड, कर्नाटक राज्यातील कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रकाश राठोड, बंजारा समाजाचे धर्मगुरु, बंजारा क्रांती दलाचे देविदास राठोड आदीजण उपस्थित होते.
जगनू महाराज पुढे म्हणाले, बंजारा समाजाला ऐतिहासिक परंपरा आहे. भारतीय इतिहासात या समाजाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. वर्षानुवर्षे भटकंती करीत असलेला हा आज मात्र विकासापासून वंचित राहिला आहे. राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रात समाजाचा म्हणावा तेवढा विकास झाला नाही.
शुक्रवार रोजी सकाळी सात वाजता श्री संत धावजी नाईक पुण्यतिथीनिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडले. सकाळी साडे आठ वाजता श्री सेवालाल महाराज, जगदंबा मातेचे पूजन होवून त्यानंतर शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये, बंजारा कलापथक, नृत्य, भजन, ढोल, डपडा आदींचा समावेश होता. त्यानंतर बंजारा तिर्थक्षेत्र महाद्वाराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी श्री हमुलाल महाराज पूजन व मिरवणूकही काढण्यात आली. त्याचबरोबर साडे दहा वाजता महानायक वसंतराव नाईक साहित्य नगरीचे उदघाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बंजारा समाजाच्या बद्दल अनेक साहित्यिकांचे पुस्तके, वृत्तपत्रे, प्रकाशने ग्रंथ यांचा प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याचबरोबर यावेळी पुष्पांजलीचा कार्यक्रम संपन्न झाले.
पहिल्या सत्रामध्ये राष्ट्रीय बंजारा साहित्य परिषदेचे उदघाटन धर्मगुरु जुगनू महाराज व परिषदेचे अध्यक्ष किसनराव राठोड, लालसिंग रजपूत, अॅड. पंडित राठोड व देशभरातून आलेल्या साहित्यिक, लेखक व बंजारा समाजाच्या हजारो बंधू व भगिनीसह जेष्ठ मान्यवर, नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती पूजनाने करण्यात आले. स्वागताध्यक्ष लालसिंग रजपूत यांनी बंजारा समाज व संस्कृतीबद्दल सविस्तर माहिती सांगितले. उपस्थित प्रमुख मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. त्यानंतर मातोश्री रत्नाई राठोड यांची साखरतुला करण्यात आली. तसेच प्रा. मोतीराज राठोड यांची ग्रंथतुला झाली. त्यानंतर जेष्ठ साहित्यिकांचा सन्मान करण्यात आले. कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगढ, पंजाब, गोवा, ओरिसा यासह देशभरातून आलेल्या अनेक प्रमुख मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
देशभरातील बंजारा समाजातील लेखक, कलाकार, संशोधक, साहित्यिकांच्या सन्मानार्थ भव्य, साहित्य दिंडी आदी कार्यक्रम राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष किसनराव राठोड यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले. बंजारा महिलानी पारंपारिक वेशभूषेमध्ये वाद्याच्या गजरात आकर्षक नृत्य सादर केले. या कार्यक्रमास राज्यासह देशभरातून बंजारा बांधव व भगिनीनी मोठ्या संख्येनी हजेरी लावली होती. कार्यक्रम स्थळी उपस्थितांना पिण्याचे पाणी व मोफत उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्ह्याचे संघटक राम पवार, प्रविण पवार, सुभाष राठोड, तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे हरिष जाधव, सरपंच गोपाळ चव्हाण आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चैत्राली निफाडकर, राजश्री, विलास राठोड, धनंजय बानकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड. पंडित राठोड, शंकर आडे, सचिन चव्हाण, संतोष पवार, फकिरा जाधव राधेश्याम आडे (मुंबई), नामदेव राठोड (सातारा), राजशेखर चव्हाण, बंटी राठोड (अक्कलकोट), प्रविण पवार, खुशाल राठोड (वाशिम), धर्मराज राठोड (पुणे), मोतीराम चव्हाण (सोलापूर), चुन्नीलाल जाधव (औरंगाबाद), संतोष राठोड (विजापूर), सुभाष चव्हाण, हरदिप चव्हाण (मध्यप्रदेश), दिलराज चव्हाण (गुराजत) सचिन चव्हाण, विलास राठोड, भोजराज राठोड, रेवणसिध्द चव्हाण, मोहन राठोड (सातारा), युवराज आडे (पुणे), राजेश्वर राठोड (पुणे) आदींनी परिश्रम घेतले.