उस्मानाबाद :- शासनातर्फे दुध उत्पादनास चालना देण्यासाठी  संकरित दुधाळ गायी/ म्हशीचे गट वाटप ही नाविण्यपुर्ण योजना पशुसंवर्धन विभागामार्फत उस्मानाबाद जिल्हयात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त, उस्मानाबाद यांनी दिली.
     या योजनेअंतर्गत दुधाळ 6 जनावरे खरेदी, जनावरांचा विमा, जनावरांचा गोठा, कडबा कुटटी यंत्र, खाद्य साठवणूकीचे शेड आदिसाठी  एका गटांसाठी  3 लाख 35 हजार 184  खर्च करण्यात येणार असून  या योजनेसाठी लाभार्थी हा दारिद्रय रेषेखालील असावा, अत्यल्प भुधारक  शेतकरी  (1 हेक्टरपर्यंतचे भूधारक शेतकरी), अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टरपर्यंतचे भूधारक असावा), सुशिक्षित बेरोजगार  (रोजगार व स्वयंरोगजार केंद्रात नाव नोंदणी केलेली असावी), महिला बचत गटातील लाभार्थी  ( 1 ते 4 मधील लाभार्थी असावी ).
        या योजनेसाठी सर्वसाधारण योजनेअंतर्गत 22 लाभार्थ्यांची निवड करुन 50 टक्के अनुदान व अनु. जातीच्या 20 लाभार्थी निवडीचे उददीष्ठ देण्यात आले असून या लाभार्थ्यास 75 टक्‍के अनुदान देण्यात येणार आहे.  इच्छुक लाभार्थ्यांनी गायी, म्हशीपालनांसाठी  आपले अर्ज 20 जुलै पर्यंत पाठवावा. अर्जाचा नमुना पशु विकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
 
Top