लातूर : येथील तहसीलदार महेश सावंत यांनी जल पुनर्भरण याविषयावर तयार केलेल्या "वर्षा जलसंधारणातून जलस्त्रोताचे पूनर्भरण" या घडीपुस्तिकेचे मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
यावेळी राज्याचे गृह, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार वैजनाथ शिंदे, अतिरिक्त विभागीय आयुक्त गोकुळ मवारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात, तहसीलदार महेश सावंत आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते .