सोलापूर -: जिल्हयातील शेतक-यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन शेती करण्याची भुमिका घेतली पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथे गोकुळ शुगर्सची पाया भरणी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर अलका राठोड, आ. भारत भालके, माजी मंत्री आनंदराव देवकते, माजी गृहराज्य मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, धोत्री गावाच्या सरपंच श्रीमती राणी यारगल्ले, अक्कलकोट पंचायत समिती सभापती विमल गव्हाणे उपस्थित होते.
शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, शेतक-यांनी पाणी वापराचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. इतर राज्यांमध्ये गव्हाचे पीक देखील ठिबकाचा वापर करुन घेतला जाते. जिल्हयातील सर्व शेतक-यांनी पाण्याची उपलब्धता पाहता आहे त्या पाण्याचा कमीत कमी वापर करुन शेती केल्यास उत्तम प्रकारे पीक घेता येईल. देशात कृषी उत्पादनात वाढ झालेली असून पुढील तीन वर्षाचा धान्य साठा निर्माण झाला आहे. राज्यात दुष्काळ पडला असला तरी धान्याची कमतरता नसल्याचा त्यांनी उल्लेख केला.
शेतक-यांना जास्तीत जास्त मदत करण्याची आवश्यकता असून शेतकरी जगला तरच राज्य जगेल. शेतक-यांनी पीकवीलेल्या धान्यामुळे आज देशाचा जी.डी. पी. वाढला असून अन्नधान्य मुबलकतेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची ताकद अधिक वाढली आहे. इतकेच नव्हे तर औद्योगिकरणाला प्राधान्य देऊन शेती पुरक उद्योगांमध्ये पायाभूत सुविधांची वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा जिल्हयातील शेतक-यांनी घेऊन काटकसरीने पाणी वापरुन अधिकाधिक पीक उत्पन्न घ्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आ. भालके आपल्या भाषणात म्हणाले की, सोलापूर जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी शेतक-यांच्या हिताची जाण ठेवून उजनी धरणाची निर्मिती केली. तसेच सहकाराची मुळे राज्यात रोवली. उजनीचे पाणी दुष्काळी भागातील शेतक-यांना दिल्यास शेती व शेतक-यांचा विकास होईल. जिल्हयात आज अनेक सहकारी आणि खाजगी साखर कारखाने आहेत. शेती प्रक्रिया उद्योगावरती साखर कारखान्यांनी भर दिल्यास रोजगार निर्मिती होईल. असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात माजी गृहराज्य मंत्री म्हेत्रे यांनी साखर कारखाना निर्मिती आणि शेतकरी मेळावा आयोजनामागची भूमिका विषद केली. कार्यक्रमास अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर म्हेत्रे, गोकूळ शुगर्सचे व्हाईस चेअरमन गोकूळ शिंदे, माजी आमदार विश्वनाथ्र चाकोते, प्रकाश यलगुलवार यांच्यासह अनेक लोकप्रतिनीधी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.