उस्मानाबाद -: ग्रामीण जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी लोकाभिमुख पंचायत प्रशासन दिवस “ ग्रामस्थ दिन ” दि.17 जून रोजी उस्मानाबाद जिल्हा परिषद सभागृहात सकाळी 11 ते 1 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या ग्रामस्थांनी आपल्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी समक्ष उपस्थित राहून निवेदन सादर करावीत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.