उस्मानाबाद -: सन 2013-14 या शैक्षणिक वर्षात राज्यातील विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील सर्व मान्यताप्राप्त-विनाअनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा दि.17 जून पासून सुरु करण्याचे निर्देश शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिले आहेत. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.