अक्‍कलकोट -: डिग्‍गेवाडी (ता. अक्‍कलकोट) येथील शांतीस्‍थळी शुक्रवार रोजी होणा-या बंजारा महानायक वसंतराव नाईक यांच्‍या जन्‍मशताब्‍दीनिमित्‍त आयोजित राष्‍ट्रीय बंजारा साहित्‍य  संमेलनात दिवसभर भरगच्‍च कार्यक्रम होणार असून समाज बांधवानी जास्‍तीत जास्‍त संख्‍येनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्‍याचे आवाहन राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे अध्‍यक्ष किसनराव राठोड, स्‍वागताध्‍यक्ष लालसिंग रजपूत, साहित्‍य परिषदेचे अध्‍यक्ष प्रा. मोतिराज राठोड यांच्‍यासह संयोजकानी केले आहे.
        या साहित्‍य परिषदेच्‍या उदघाटन सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्‍याय मंत्री ना. पी. बलराम नाईक, माजी उपमुख्‍यमंत्री विजयसिंह मोहितेपाटील, राज्‍याचे पशुसंवर्धन, दुग्‍धविकास व मत्‍स्‍यवसाय मंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण, पाणीपुरवठा व स्‍वच्छता मंत्री ना. लक्ष्‍मणराव ढोबळे, अन्‍न व औषध पुरवठा मंत्री ना. मनोहर नाईक, आंध्रप्रदेशचे माजी पर्यटनमंत्री अमरसिंग लिलावत, आमदार प्रणिती शिंदे, सोलापूरचे महापौर सौ. अलका राठोड, माजी खासदार रणजितसिंह पाटील, खासदार हरिभाऊ राठोड, माजी गृहराज्‍यमंत्री सिध्‍दराम म्‍हेत्रे, आमदार एस.एम. पाटील, माजी आमदार महादेव पाटील, सोलापूर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष मनोहर डोंगरे, कर्नाटक राज्‍यातील कॉंग्रेसचे प्रवक्‍ते प्रकाश राठोड आदीजणांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
          दि. 7 जून रोजी सकाळी सात वाजता श्री संत धावजी नाईक पुण्‍यतिथीनिमित्‍त कार्यक्रम, साडे आठ वाजता श्री सेवालाल महाराज, जगदंबा मातेचे पूजन, नऊ वाजता शोभायात्रेस प्रारंभ होणार असून साहित्‍य, ग्रंथ, आभुषण व साहित्यिकांची बैलगाडीने भव्‍य मिरवणूक काढण्‍यात येणार आहे. या मिरवणुकीमध्‍ये, बंजारा कलापथक, नृत्‍य, भजन, ढोल, डपडा यासह आतिषबाजी करण्‍यात येणार आहे. त्‍यानंतर दहा वाजता बंजारा तिर्थक्षेत्र महाद्वाराचे उदघाटन, सव्‍वा दहा वाजता श्री हमुलाल महाराज पूजन व मिरवणूक, साडे दहा वाजता महानायक वसंतराव नाईक साहित्‍य नगरीचे उदघाटन, त्‍यानंतर महाभोग व पुष्‍पांजली, पावणे अकरा वाजता श्री संत सेवालाल महाराज दरबार उदघाटन होईल.
        पहिल्‍या सत्रात सकाळी अकरा वाजता राष्‍ट्रीय बंजारा साहित्‍य परिषदेचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उदघाटन होणार आहे. त्‍यानंतर सरस्‍वती पूजन, दिप प्रज्‍वलन, ग्रंथपूजन, स्‍वागतगीत, सांस्‍कृतिक कार्यक्रम, स्‍वागताध्‍यक्ष लालसिंग रजपूत यांचे मनोगत, धर्मगुरु श्री संत रामराव महाराज पूजन, सन्‍मान व सत्‍कार, मातोश्री रत्‍नाबाई राठोड यांची साखरतुला तर प्रा. मोतीराज राठोड यांची ग्रंथतुला होईल. त्‍यानंतर जेष्‍ठ साहित्यिकांचा सन्‍मान व प्रा. मोतीराज राठोड सह बंजारा समाजाचे अभ्‍यासक व साहित्यिक, मंत्री महोदय, प्रमुख मान्‍यवरांचे मनोगत होणार आहे.
        दुस-या सत्रात दुपारी एक ते चार या वेळेत बंजारा समाजाचा इतिहास, बंजारा संस्‍कृती रिती-रिवाज व परंपरा, बंजारा लोकसाहित्‍य, साहित्यिक, लेखकांसाठी आचारसंहिता व मार्गदर्शन, बंजारा धार्मिक केंद्राद्वारे सामाजिक विकास व प्रबोधन, संत सेवालाल महाराजांचे विचार, बंजारा समाज व पुरोगामी विचारधारा, बंजारा संघटनेत समन्‍वयाची आवश्‍यकता या विषयावर अनुक्रमे डॉ. भांग्‍या भुक्‍या (हैदराबाद), महेशचंद्र बंजारा (राजस्‍थान), डॉ. सुर्या धनंजय नाईक , डॉ. राम कोटी पवार (आंध्रप्रदेश), डॉ. गोवर्धन बंजारा (गुजरात), डॉ. हरीलाल पवार (कर्नाटक), डॉ. प्रभजन चव्‍हाण (विदर्भ), शाम येडेकर (महाराष्‍ट्र), अमरसिंग तिरावत आदीजणांचे बंजारा समाजाच्‍या विकासाबद्दल सोलापूरचे महापौर अलका राठोड, राष्‍ट्रीय बंजारा क्रांती दलाचे तथा खा. हरिभाऊ राठोड, दिगंबर राठोड, बंजारा क्रांती दलाचे देविदास राठोड, गोर बंजारा समाज संघटनेचे हिरासिंग राठोड, सेवालाल आर्मीचे राधेश्‍याम आडे, गोरसिकवाडीचे संदेश चव्‍हाण, राष्‍ट्रीय महिला बंजारा पार्टीच्‍या लिला चव्‍हाण, वसंतराव नाईक युवा संघटनेच्‍या डॉ. संयोगिता नाईक, श्रावणसिंग राठोड (मध्‍यप्रदेश), रमेश चव्‍हाण आदींचे मनोगत होणार असून धर्मगुरु तपस्‍वी श्री संत रामराव महाराज यांचे मार्गदर्शन होणार आहे.
 
Top