बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी तालुक्यातील दिलीप सोपल यांचे नाव मागील अनेक वर्षापासून राज्यभर विविध निमित्ताने गाजत आहे. पाच वेळा वेगवेगळ्या चिन्हावर निवडून येण्याचा विक्रम करणा-या सोपल यांनी सुरुवातीपासूनच शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे धडे घेत काम केले आहे. विविध कारणांसाठी त्यांना अपक्ष तिकिटावर निवडणूक लढवावी लागली. परंतु त्यांनी शरद पवार यांच्याशी असलेली नाळ तोडली नाही. शरद पवार यांच्या पाठोपाठ दुस-या पिढीतील असलेल्या अजित पवार यांच्याशीही त्यांची असलेली मैती महाराष्ट्राला अवगत आहे. शरद पवार यांच्या कन्या खा. सुप्रियाताई सुळे यांच्या अनेक उपक्रमांना जिल्ह्यातून सकारात्मक प्रतिसाद देवून पवार कुटुंबियांशी असलेल्या नात्याची जिल्ह्याला वेळोवेळी जाणीव करुन दिली आहे.
कालपर्यंत दिलीप सोपल हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांत अत्यंत मनमोकळ्या गप्पा मारुन राज्यातील सुरु असलेल्या बदलाच्या संकेतांना आपल्या गावचे नसल्यासारखे दाखवून आयत्या वेळेला त्यांनी मुंबई गाठली. अपक्ष असल्याने त्यांच्या पाठीमागे सर्व अपक्षांचा गठ्ठा खिशातच असल्याने सर्व अपक्षांच्या गठ्ठा खिशातच असल्याने सर्व अपक्षांच्या इच्छा त्यांनी आजपर्यंत पूर्ण केल्या आहेत. जे काम होणारच नाही ते अगदी सहजपणे करण्याची त्यांची वेगळी खुमी असल्याने त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी अनेक आमदार, खासदार व मंत्री धडपडत असतात. प्रत्येक विषयावर विविध प्रकारचे विनोद तया करुन किस्से बनविणारा हरहुन्नरी दिलीप सोपले हे वेगळेच रसायन आहे.
सर्वसामान्य कुटुंबाच्या बेकार तरुणांना काहीतरी उद्योगधंदे व रोजगार उपलब्ध करुन द्यावा, यासाठी त्यांनी आपल्या जीवनातील बहुमोल वेळ घालविला आहे. बार्शी शहराला त्यांच्या कॅबीनेटच्या रुपाने पहिल्यांदाच कॅबीनेट मंत्रिपद मिळाले आहे. राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याची गरज निर्माण झाल्याने सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नसल्याने त्यांना कसलीही पूर्व कल्पना नसताना त्यांना बोलावून मंत्रिपद दिले गेले आहे. पक्षातील असो अथवा विरोधातील असो अनेक आमदारंच्या संचाशी त्यांनी विवधि मार्गांनी संपर्क ठेवला आहे. जिल्ह्याचे नेतृत्व करणारे माजी आमदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी देखील त्यांचे आतून वेगळे संबंध आहेत. प्रत्येक आमदार खासदारांच्या कुडल्या त्यांना तोंडपाठ असल्याने अनेक वर्षाच्या राजकारणातील धडे घेवून त्यांचे प्रबल्भ व्यक्तीमत्व तयार झाले आहे. त्यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांचे देखील वेगवेगळे गट असून प्रत्येक गटाकडून विवधि प्रकारची समाजोपयोगी कामे करणे व अनेक प्रकारच्या माहिती गोळा करण्यासाठी त्यांचे खास कार्यकर्ते तयार आहेत. त्यांचे बंधू सुधीर सोपल यांचे वेगळे कार्यकर्ते, पुतण्या योगेश सोपल यांचे वेगळे कार्यकर्ते सातत्याने कार्यरत असून त्यांचे बाहेरुन दिसणारे राजकारण वेगळे आणि प्रत्यक्षातील राजकारण वेगळेच आहे. कोणता कार्यकर्ता आपला आणि कोणता केवळ तात्पुरत्या सुखासाठी आपल्याकडे आला आहे. याची चांगली जाण या तिन्ही सोपल यांना आहे.
अगदी कालपर्यंत आमदार सोपल यांनी मंत्रीपदाबाबत बोलताना मी कोणाच्या संपर्कात नाही. माझ्या कोणी संपर्कात नाही, मला मंत्रीपद मिळालेच तर त्यामध्ये मला वेगळे असे कौतुक वाटणार नाही, असे म्हणत प्रत्यक्ष त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा खुद्द ना. शरद पवार यांनी त्यांना प्रत्यक्ष सांगितल्यावर त्यांनी सर्व कामे सोडून आपल्या राष्ट्रवादीचे कार्य करण्याचा निर्धार केला आहे. बार्शीत काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी झाली तर काही ठिकाणी अत्यंत सन्नाटा जाणवत होता. काही ठिकाणी तणावाचे वातावरण दिसून आले. अनेक कार्यकर्ते यांच्या मंत्रीपदाचा जल्लोष पाहण्यासाठी रात्रीच मुंबईकडे धावले तर काही कार्यकर्त्यांनी रात्रीतून डिजीटल उभे करुन आपल्या आनंदाचे दर्शन घडविले.