नळदुर्ग -: बॉलीवूड चित्रपट रिलीज झाल्‍याबरोबर दुस-या दिवशीच घराघरात चित्रपटाची सिडी आणले जात असून थोर महापुरुषांच्‍या जीवन चरित्रावरील पुस्‍तक आणले जात नाही. आजच्‍या पिढीवर वेगळे संस्‍कार घडत असून देश व राष्‍ट्र हितासाठी वीर महाराणा प्रताप यांच्‍या गौरवशाली कार्याची व विचाराची गरज आहे. त्‍याकरीता सुसंस्‍कृंत व बलशाली पिढी घडविण्‍याकरीता युवकांनी महाराणा प्रताप यांचे विचार आत्‍मसात करण्‍याचे आवाहन कॉंग्रेस सेवा दलाचे शहराध्‍यक्ष विनायक अहंकारी यांनी केले.
    नळदुर्ग येथे मंगळवार रोजी महाराणा प्रताप बहुउद्देशीय सामाजिक संस्‍थेच्‍यावतीने महाराणा प्रताप यांच्‍या 427 व्‍या जयंतीनिमित्‍त आयोजित कार्यक्रमात विनायक अहंकारी हे प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिवसेनेचे तुळजापूर तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर तर प्रमुख पाहुणे म्‍हणून माजी नगराध्‍यक्ष तथा विद्यमान नगरसेवक नितीन कासार, अमृत पुदाले, माजी नगरसेवक सुधीर हजारे, कॉंग्रेसचे युवक शहराध्‍यक्ष बसवराज धरणे, राष्‍ट्रीवादीचे शहर युवक अध्‍यक्ष महेबुब शेख आदीजण उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्‍या प्रारंभी प्रमुख मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दिप प्रज्‍वलन, पुष्‍पहार अर्पण करुन व श्रीफळ वाढवून वीर महाराणा प्रताप यांच्‍या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्‍यात आले. यावेळी पुढे बोलताना अहंकारी म्‍हणाले की, सर्वत्र थोर महापुरुषांची जयंती उत्‍साहाने साजरी केली जात असून यापुढे नुसती जयंती साजरी न करता थोर महापुरुषांचे विचार डोक्‍यात घेवून त्‍याप्रमाणे प्रत्‍येकांनी कार्य करणे गरजेचे झाले आहे. त्‍याचबरोबर मुलांना लहानपासून महापुरुषांचे चरित्र वाचायला दिले पाहिजे. आज प्रत्‍येकाला आपल्‍या मुलांना डॉक्‍टर, इंजिनिअर बनवायचे आहे. त्‍यामुळे ते आपल्‍या मुलांना थोर महापुरुषांचे चरित्र वाचायला देत नाहीत. त्‍यामुळे आजची पिढी थोर महापुरुषांचे विचार विसरत चालली आहे. भारताच्‍या इतिहासात महाराणा प्रताप व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी आपल्‍या साम्राज्‍यासाठी खूप कठोर संघर्ष केले. त्‍यांच्‍या राजवटीत महिलांना आदर, सन्‍मानाची वागवणूक देवून महिलांच्‍या रक्षणासाठी रजपूत समाज आपल्‍या प्राणाची बाजी लावल्‍याचे उल्‍लेख आहे. युवकांनी महाराणा प्रताप यांच्‍यासह अनेक महापुरुषांचे चरित्र वाचल्‍यास त्‍यांच्‍या कार्याची व विचाराची माहिती मिळेल, त्‍यातून त्‍यांची प्रेरणा घेवून समाज कार्य करण्‍याचे सांगून भारतात जेव्‍हा मुघलाची सत्‍ता होती तेंव्‍हा सर्व राज्‍ये मुघलांच्‍या ताब्‍यात होते. मात्र केवळ महाराणा प्रताप यांचेच राज्‍य मुघलांच्‍या ताब्‍यात नव्‍हते. महाराणा प्रताप यांनी मुघलांशी लढा देत आपल्‍या राज्‍याचे रक्षण केले. घरोघरी महाराणा प्रताप यांचे विचार पोहचविण्‍याचे कार्य युवकांनी केले पाहिजे, असेही त्‍यांनी शेवटी सांगितले. वीर महाराणा प्रताप यांच्‍या जीवन कार्याबद्दल आजच्‍या पिढीला माहिती व्‍हावी, या हेतूने दुरदर्शनवर मालिका सुरु असून प्रत्‍येकांनी पाहून त्‍यांचा बोध घ्‍यावा, असे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर यांनी सांगितले.
    कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक महाराणा प्रताप बहुउद्देशीय सामाजिक संस्‍थेचे सचिव मनीष हजारे यांनी तर सूत्रसंचालन तुळजापूर लाईव्‍हचे संपादक  शिवाजी नाईक यांनी केले. तर आभार पृथ्‍वीराज चौहान यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी बलदेवसिंह ठाकूर, अतुलसिंह हजारी, मंगेश चंदेले, जितुसिंह चंदेले, सागरसिंह हजारी, अभिजित ठाकूर, अजितसिंह हजारी, अमरजीत बिसेनी, अतिश गहरवाल, संदीप हजारी, शुभम हजारी, प्रताप हजारी, बालाजीसिंह चौहान, महेश हजारी, दिनेशसिंह हजारी, दिपक चौहान, अनिल दिक्षित, सुजित हजारी, कुबरसिंह चौहान, अमोलसिंह हजारी, इंद्रजीतसिंह ठाकूर, विश्‍वजितसिंह ठाकूर, विजय दासकर, संदीप गायकवाड, सचिन सुरवसे, श्रमिक पोतदार, गजानन कुलकर्णी, रत्‍नाकर सुरवसे, श्रीकांत माने, बालाजी ठाकूर, नागेश ठाकूर आदीनी विशेष परिश्रम घेतले.
 
Top