उस्मानाबाद :- जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत निर्मल भारत अभियानाची जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाते व यातून 100 टक्के हागणदारीमुक्त होणा-या ग्रामपंचायतींना निर्मल पुरस्कार व बक्षीस रक्कम देवून केंद्रशासनाकडून गौरविण्यात येते यासाठी जिल्हयातील 138 ग्रामपंचायतींची तपासणी 15 जुलै 2013 अखेरपर्यंत होणार आहे. या ग्रामपंचायतींनी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्याकडून तपासणीची सविस्तर प्रश्नावली प्राप्त करुन त्याप्रमाणे गावातील उर्वरित कामे 15 जुलै 2013 अखेरपर्यंत पुर्ण करावीत व ग्रामपंचायतीस निर्मल ग्राम पुरस्कार मिळेल याची दक्षता सरपंच, सर्व ग्राम पंचायत सदस्य, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास यांनी केले आहे.
निर्मल भारत अभियानात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असून यातून 100 टक्के हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींचा प्रस्ताव जिल्हा कक्षामार्फत निर्मल ग्राम पुरस्कारासाठी केंद्रशासनाकडे पाठविला जातो. हा पुरस्कार केंद्र शासनाकडून सन 2005 पासून देण्यात येतो. सन 2012 पासून यात काही बदल झालेला असून आता संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर गुणांकन पध्दतीने तपासणी होणार आहे. त्यात तपासणीसाठी खालीलप्रमाणे गुण ठेवण्यात आलेले आहेत. गावातील वैयक्तिक शौचालय बांधकाम-50 गुण, शालेय स्वच्छता-8 गुण, अंगणवाडी स्वच्छता-8 गुण, कुटुबांना पुरेशा पाण्याची उपलब्धता -10 गुण, प्रचार व प्रसिध्दी-9 गुण, घनकचरा व्यवस्थापन-5 गुण, सांडपाणी व्यवस्थापन-10गुण अशाप्रकारे एकूण गुणापैकी 90 गुण निर्मल ग्राम पुरस्कार मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीस प्राप्त होणे आवश्यक आहे.
या ग्रामपंचातींना पुरस्कार मिळाल्यानंतर लोकसंख्येनुसार रु.1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत बक्षीस रुपाने रक्कम मिळणार असून या ग्रामपंचायतीत कुटुंबांना पाण्यासाठी नळ जोडणी असेल तर राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातून अतिरिक्त बक्षीस रक्कम लोकसंख्येनुसारच रु. 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत मिळणार असल्याचे कळविण्यात आले आहे.