मुंबई -: राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागामार्फत मच्छिमार तरुणांना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन आणि सागरी डिझेल इंजिनाची देखभाल व निगा याबाबत प्रशिक्षण देण्यात येते. या शासकीय प्रशिक्षण केंद्राच्या 110 व्या सत्राची वर्सोवा येथे 1 जुलै पासून सुरुवात होत आहे. इच्छुक उमेदवारांनी स्वत:च्या हस्ताक्षरातील अर्ज 19 जून रोजी किंवा त्यापूर्वी या कार्यालयाकडे पोहचतील, असे पाठवावेत. विहित नमुन्यातील छापील अर्ज आपल्या संस्थेच्या शिफारशीसह शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा-मुंबई, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, अंधेरी (प.) मुंबई 400061 या ठिकाणी पाठवावेत. छापील अर्ज वरील कार्यालयात मिळतील. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी 8828385018 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.
या प्रशिक्षणासाठी दारिद्रय रेषेवरील उमेदवारांस दरमहा रु.450 व दारिद्रय रेषेखालील उमेदवारांस दरमहा रु.100 इतके प्रशिक्षण शुल्क आकारले जाईल. इच्छूक उमेदवाराचे वय 18 ते 35 च्या दरम्यान असावे. किमान चौथी पास, पोहता येणे आवश्यक, उमेदवार क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असावा. मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. उमेदवाराकडे स्मार्ट कार्ड असणे आवश्यक असून नसल्यास त्यासाठी अर्ज केल्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज विहित नमुन्यात व मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारस पत्रासह असणे आवश्यक आहे. उमेदवार दारिद्रय रेषेखालील असल्यास दारिद्रय रेषेखालील क्रमांकासह दारिद्रय रेषेखाली असल्याचा संबंधित अधिकाऱ्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.