नळदुर्ग -: भरधाव वेगाने जाणा-या ट्रकने मोटारसायकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवरील दस्तापूर (ता. लोहारा) गावानजीक रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित दोन ट्रक ताब्यात घेतल्या आहेत.
रमेश सातलिंग उपासे (25, रा. जेवळी) असे अपघातात ठार झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे तर अविनाश हावले (27, रा. जेवळी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. यातील रमेश व अविनाश हे दोघे जळकोटहून जेवळीकडे दुचाकीवर निघाले होते. दस्तापूरनजीक सोलापूरहून हैदराबादकडे निघालेल्या ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. यात मोटारसायकल जवळपास 20 फुट दूर फरफटत गेली. त्यात रमेश उपासे हा जागीच ठार झाले तर अविनाश हावले गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी उमरगा येथे नेण्यात आले. अपघातानंतर ट्रकचालक न थांबता निघून गेला. घटनास्थळावर शेतकरी सतीश गंगणे यांनी दुचाकीवरून पाठलाग केला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नळदुर्ग महामार्गचे पोउपनि उत्तरेश्वर बारकूल, मुरुम ठाण्याचे पोउपनि दत्तात्रय पवार, कैलास चाफेकर, राजू कोळी, यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर पोलिसांनी पाठलाग करुन संशयावरुन ट्रक (जी.जे. २५ ७४७४) ताब्यात घेतला. तर उमरगा येथे याच अपघात प्रकरणी (एम. एच. १0/झेड २४७४) या क्रमांकाच्या ट्रकला उमरगा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरील घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पवार हे करीत आहेत.