उस्मानाबाद : जिल्ह्यात भारत संचार निगम सेवेत ठिकठिकाणी अडचणी येत असून ग्राहकांचे फोन वारंवार कट होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच अनेक ठिकाणी फोन लागत नसताना परंडा तालुक्यातील तांदुळवाडी परिसरातील गावात विद्युतपुरवठा सुरु असेल तरच बीएसएनएलची सेवा मिळते. एकीकडे ग्राहकांच्या तक्रारी वाढलेल्या असतानाच अधिकारी मुख्यालयी न रहाता इतर शहरात वास्तव्यास असल्याने त्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांतून होत आहेत.
सध्या पावसाळा सुरु असून मोठे वादळ व पाऊस यामळे झाडे पडून बीएसएनएलच्या वायर तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच उमरगा ते सोलापूरदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने त्या ठिकाणी बीएसएनएलचे वायर वारंवार तुटत असल्याने त्या भागातील बीएसएनएलच्या ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.या कारणांमुळे बीएसएनएलची सेवा ठप्प झाल्यानंतर सदरील ठिकाणी दुरुस्ती करुन सेवा पुन्हा पूर्ववत होण्यासाठी १२ तासाहून अधिक कालावधी लागतो. त्यातच अशा अडचणी रात्री आल्या तर दुसर्या दिवशी सायंकाळपर्यंत सेवा ठप्पच रहाते. कॉल डिस्कनेक्शन होण्याचे प्रमाणही वाढल्याचे मागील दोन महिन्यापासून निदर्शनास येत आहे. शिवाय काहीवेळा इतर नेटवर्कवरुन बीएसएनएल व बीएसएनएलवरुन इतर नेटवर्कला कॉल करतानाही अडचणी येतात. शेजारी थांबूनही फोन केला असता आऊट कव्हरेज अथवा 'स्वीचऑफ' चा मेसेज ऐकायला मिळत असल्याने ग्राहकांतून आश्चर्य व्यक्त होते. एकीकडे सेवेमध्ये अशा अडचणी असताना उस्मानाबादसह जिल्ह्यातील आठही तालुक्यात अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी असलेल्या सरकारी निवासस्थानात रहात नसल्याने त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांतून ऐकायला मिळतात.

टेक्नीशियन नाही, उद्या बघू !
झाड पडणे, पाऊस येणे आदी काही नैसर्गिक कारणामुळे एखाद्या भागातील बीएसएनएलच्या सेवेत अडचणी आल्यास त्या ठिकाणचे नागरिक कार्यालयाशी संपर्क साधतात. मात्र आज टेक्नीशियन नाही, उद्या बघू अशी मोघम उत्तरे त्यांना मिळतात. पैसे देवूनही अडचणी येत असल्याने बीएसएनएलच्या ग्राहकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत असल्याने ग्राहकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विद्युत पुरवठा असेल तरच सेवा
ग्रामीण भागात बीएसएनल सेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. परंडा तालुक्यातील तांदुळवाडी येथील टॉवरवरुन काटेवाडी, टोकरवाडी,देऊळगाव जगदाळवाडी, पाचवड, या गावांमधील दूरध्वनी व भ्रमणध्वनी चालतात. मात्र मागील तीन महिन्यापासून फक्त विद्युतपुरवठा सुरु असतानाच बीएसएनलची सेवा मिळते. त्या ठिकाणच्या बॅटर्या निकामी झाल्याने हा प्रसंग उदभवला आहे. वारंवार तक्रारी करुनही केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे तांदूळवाडीचे माजी सरपंच अजय खरतडे यांनी सांगितले.

लातूर, सोलापूर येथून अप-डाऊन
उस्मानाबाद येथील बीएसएनएलच्या कार्यालयात पाच जिल्हा अभियंता तर १४ उपमंडळ अधिकार्यांची नियुक्ती आहे. त्यापैकी तीन जिल्हा अभियंता व ११ उपमंडळ अधिकारी लातूर व सोलापूर या ठिकाणाहून ये-जा करीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. याबाबत संबंधित अधिकार्यांना विचारले असता सरकारी निवासस्थानामध्ये पाण्याची सोय नाही. अधिकार्यांना पाणी विकत घ्यावे लागत असल्याने या ठिकाणी 'ते' रहात नाहीत असे त्यांनी सांगितले.
सौजन्य : लोकमत