औरंगाबाद - बुद्धगयेतील दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे मराठवाड्यातील धर्माबादपर्यंत असल्याचा दहशतवादविरोधी पथकाचा प्राथमिक अंदाज आहे. या हल्ल्यात चर्चेत आलेला मकबूल सय्यद ऊर्फ झुबेर हा नांदेड जिल्ह्यातील धर्माबादचा रहिवासी असून तो इंडियन मुजाहिदीनचा ऑपरेटिव्ह आहे.
        हाजी सय्यद यांच्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मकबूल 1990 च्या सुमारास आंध्र प्रदेशातील वरंगल येथील आझम घोरीच्या संपर्कात आला आणि आधी गुन्हेगारी व नंतर दहशतवादी कारवायांकडे वळला. 1998 मध्ये आझम घोरीने त्याला युरिया, डिझेल आणि शोभेच्या दारूपासून बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. घोरीच्या धर्माबाद येथील मदिना मशीद परिसरातील घरात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेत असतानाच बॉम्बचा स्फोट झाला आणि मकबूलच्या दहशतवादी कारवाया पहिल्यांदा प्रकाशात आल्या. धर्मवेडेपणामुळे दहशतवादाकडे वळलेल्या मकबूल, आझम गौरी व रोशन बेग या तिघांनी 1999 मध्ये आंध्र प्रदेशातील मंचरियाल गावात इंडियन मुस्लिम मोहम्मदीन मुजाहिदीनच्या (आयएमएमएम)स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. समाजात हुंडा बंदी, भ्रष्टाचाराविरुद्ध संघर्ष आणि अश्लील चित्रपटांना विरोध अशा गोंडस सामाजिक उद्देशांनी स्थापन केलेली आयएमएमएम प्रत्यक्षात समाजातील तरुणांची माथी भडकवून त्यांना दहशतवादी कारवायांकडे आकर्षित करण्याचे काम करत होती.
      मकबूलची गुन्हेगारी कारकीर्दही आझम गौरीच्या संगतीनेच सुरू झाली.  1999 मध्ये त्याने व गौरीने निझामाबाद जिल्ह्यातील बोधन येथील कृष्णमूर्ती या व्यक्तीचा खून केला. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षाही झाली होती. जन्मठेप भोगून मकबूल 2009 मध्ये तुरुंगाबाहेर आला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तो आणखीच कट्टर मूलतत्त्ववादी बनला. 1999 मध्येच त्याने आंध्र प्रदेशातील उप्पल येथे मशिदीच्या जागेवर अतिक्रमण केल्याच्या आकसातून देवेंद्र नावाच्या व्यक्तीचा खून केला. 2000 मध्ये झालेल्या हैदराबादेतील महावीर प्रसाद या सराफाच्या खुनातही त्याचा हात होता.
     2000 मध्ये नांदेडच्या शारदा टॉकीजजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाबरोबरच हैदराबादेतील लाल दरवाजा परिसरातील काकेतिया हॉटेल आणि सिकंदराबादच्या लांबा टॉकीजमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मकबूलचा हात असून त्याच्यावर तेथील पोलिसात गुन्ह्यांची नोंदही झाली आहे.
 
एमआयएमशी संबंध
 
 नांदेड -: वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत 81 पैकी 11 जागा जिंकणा-या हैदराबादस्थित मजलिसे  इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) या राजकीय संघटनेच्या धर्माबाद शाखेचा मकबूल सय्यद हा अध्यक्ष होता. एमआयएमचा नेता अब्दुल रऊफ यांनी त्याची अध्यक्षपदी निवड केली होती. ऑगस्ट 2012 मध्ये पुण्यातील जंगली महाराज रोडवरील बॉम्बस्फोटप्रकरणी मकबूलला अटक झाल्यानंतर एमआयएमने मकबूलशी आपला संबंध नसल्याचे सांगून अंग झटकले.
 
गावठी बॉम्ब तयार करण्यात  तरबेज
    मकबूल सय्यद हा युरिया, डिझेल आणि शोभेच्या दारूबरोबरच अमोनियम नायट्रेटपासून बॉम्ब तयार करण्यात तरबेज असून इंडियन मुजाहिदीनच्या भारतातील ऑपरेटिव्हस्ना बॉम्ब तयार करण्याचे आणि बॉम्बस्फोट करावयाच्या ठिकाणांची रेकी कशी करायची याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्याच्यावर असल्याचे एटीएसच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
 
धर्माबादच्या मकबूल सय्यदकडे योजना!
    मकबूलच्या दहशतवादी कारवाया पहिल्यांदा प्रकाशात आल्या. धर्मवेडेपणामुळे दहशतवादाकडे वळलेल्या मकबूल, आझम गौरी व रोशन बेग या तिघांनी 1999 मध्ये आंध्र प्रदेशातील मंचरियाल गावात इंडियन मुस्लिम मोहम्मदीन मुजाहिदीनच्या (आयएमएमएम)स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. समाजात हुंडा बंदी, भ्रष्टाचाराविरुद्ध संघर्ष आणि अश्लील चित्रपटांना विरोध अशा गोंडस सामाजिक उद्देशांनी स्थापन केलेली आयएमएमएम प्रत्यक्षात समाजातील तरुणांची माथी भडकवून त्यांना दहशतवादी कारवायांकडे आकर्षित करण्याचे काम करत होती.
मकबूलची गुन्हेगारी कारकीर्दही आझम गौरीच्या संगतीनेच सुरू झाली.  1999 मध्ये त्याने व गौरीने निझामाबाद जिल्ह्यातील बोधन येथील कृष्णमूर्ती या व्यक्तीचा खून केला. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षाही झाली होती. जन्मठेप भोगून मकबूल 2009 मध्ये तुरुंगाबाहेर आला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तो आणखीच कट्टर मूलतत्त्ववादी बनला. 1999 मध्येच त्याने आंध्र प्रदेशातील उप्पल येथे मशिदीच्या जागेवर अतिक्रमण केल्याच्या आकसातून देवेंद्र नावाच्या व्यक्तीचा खून केला. 2000 मध्ये झालेल्या हैदराबादेतील महावीर प्रसाद या सराफाच्या खुनातही त्याचा हात होता. 2000 मध्ये नांदेडच्या शारदा टॉकीजजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाबरोबरच हैदराबादेतील लाल दरवाजा परिसरातील काकेतिया हॉटेल आणि सिकंदराबादच्या लांबा टॉकीजमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मकबूलचा हात असून त्याच्यावर तेथील पोलिसात गुन्ह्यांची नोंदही झाली आहे.

* साभार : दिव्‍यमराठी
 
Top