लातूर : औरंगाबाद येथील जात पंचायतीच्या सदस्यांनी नाशिकच्या जात पंचायत सदस्यांच्या सांगण्यावरुन लातुरातील एका कुटुंबास बहिष्कृत केल्याची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील नाशिक जात पंचायतीच्या पाच सदस्यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या पाच सदस्यांचा ताबा मिळविण्यासाठी लातूर पोलिस रवाना झाले आहेत.
गणेश विठ्ठलराव धुमाळ हे मुळ धामणगाव ता. फुलंब्री जि. औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. दि. २२ मे २०१० रोजी त्यांचा विवाह शिवाजी जोशी रा. दिपज्योतीनगर यांच्या मुलीशी झाला होता. तेंव्हापासून ते दिपज्योतीनगर, लातूर येथे राहतात. त्यांचे सासरे येथीलच एका अनाथाश्रमात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. लग्न झाल्यापासून औरंगाबाद येथील जात पंचायतीचे सदस्य नाशिक येथील जात पंचायतीच्या मार्गदर्शनानुसार माझ्या कुटूंबाला व मला त्रास देऊ लागले आहेत. असे तक्रारीत म्हटंले आहेत. तु सोयरीक कशी केली? ते आम्हाला मान्य नाही असा दबाब माझ्यावर व माझ्या कुटूंबावर आणत आहेत. साखर पुड्यापुर्वी काही पंचाना लातूरला आणून सास-याची भेटी घडवून आणली होती. सास-याने जोशी असल्याचे सर्व पुरावे दिले तरीही ते मानत नाहीत. तरीही त्यांनी लग्नाला विरोध केला. परंतू आम्ही न जुमानता लग्न केले असता औरंगाबादवरुन कोणीही लग्नाला आले नाही. आमच्या कुटूंबियांच्या कोणत्याच विधीला कोणीच येत नाही. पंचानी आमच्या कुटूंबास बहिष्कृत केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
याप्रकरणी दिलीप शिंदे, दामोदर हिंगमिरे, काशीनाथ हिंगमिरे रा. टि.व्ही. सेंटर औरंगाबाद, नारायण धुमाळ, विनायक लक्ष्मण शिंदे, भास्कर शिंदे, शिवाजी कुंभारकर, रामनाथ धुमाळ, भिमा धुमाळ, मधुकर कुंभारकर अशा ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील नाशिक येथील जात पंचायतीचे पाच पंच तेथील पोलिसांच्या अटकेत आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी लातूर पोलिस नाशिककडे रवाना झाले आहेत. अटक असलेल्यामध्ये दोन विद्यमान नगरसेवक व एक माजी नगरसेवकाचा समावेश आहे.

* साभार : एकमत