उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा मागासवर्गीय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने तक्रार केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील महाराष्ट्र दर्शन प्रवास सवलत घोटाळा उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील १९ खाजगी शाळेतील २०९ शिक्षक, कर्मचा-यांनी रजा सवलत मंजूर होण्यापूर्वीच तिचा उपभोग घेऊन १९ लाख ६० हजार ८२१ रुपये एवढी रक्कम हडप केली आहे. यासंदर्भात संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा इशारा संघटनेचे सरचिटणीस एम. एन. रोडगे यांनी शिक्षणमंत्र्यांना दिला आहे.
महाराष्ट्राचा भौगोलिक, एैतिहासीक अभ्यास व्हावा त्यातून विद्याथ्र्यांना गुरुजनांचे मार्गदर्शन व्हावे या उद्दात्त हेतूने राज्यशासनाने शिक्षकांना महाराष्ट्र दर्शन प्रवास सवलत सुरु केली. शालेय सुट्टीच्या काळात म्हणजे दिवाळी व उन्हाळी सुट्ट्यात शिक्षकांनी हा प्रवास करावा त्यासाठी मुख्याध्यापक, शालेय समितीची पूर्व मान्यता घ्यावी असा शासनाचा आदेश आहे. त्यासोबतच कर्मचारी प्रवासास केंव्हा निघाले, नियोजित ठिकाणी केंव्हा पोहंचले, परत केंव्हा आले या सर्वांचा उल्लेख शिक्षकाकडून सहपत्रावर करुन घ्यावा असे निर्देश आहेत. आणि त्याचा हिशोब जिल्हा परिषद प्राथमिक वेतन पथकाने ठेवावा असे निर्देश आहेत. मात्र संबंधित शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी, वेतन पथकातील अधिक्षक, कर्मचारी यांनी संगणमताने या महाराष्ट्र दर्शन रजा सवलत योजनेत संगणमताने लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे. जिल्ह्यातील १९ खाजगी शाळेतील २०९ शिक्षक व कर्मचा-यांनी महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलतीचा एकाच वेळी व एकाच ठिकाणी लाभ घेतल्याचे दिसुन आले. यातील अनेक कर्मचा-यांनी शाळा सुरु असतानाही या रजेचा लाभ घेतला. शिवाय रजा सवलत उपभोगण्यापूर्वी त्या मुख्याध्यापक व शालेय समितीकडून मान्य करुन घेतल्या नाहीत. प्रवासाहून आल्यानंतर अनेकांनी शालेय समितीकडे अर्ज करुन नंतर मान्यता घेतल्याचे दिसुन येते. तसेच शिक्षक आणि संबंधित संस्थेच्या मुख्याध्यापकांनी रजा सवलत देयके सादर करण्यापूर्वी प्रत्यक्ष प्रवास केल्याची खात्री करणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. एकाच वेळी, एकाच ठिकाणी २०९ शिक्षक कुठल्या वाहनाने, कसे गेले याचा कुठेच ताळमेळ लागत नाही. शिवाय महाराष्ट्र रजा प्रवास सवलतीच्या रक्कमेचा अदायीसाठी अंदाज पत्रकात तरतुद नसताना वेतन पथकाने सदर योजनेवर खर्च केल्याचे दिसुन आले आहे. शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांनी वर्षातुन दोन वेळेस दिपावली व उन्हाळी सुट्टीनंतर एक महिन्याच्या आत अशा देयकांची पडताळणी करुन घेणे आवश्यक होते. परंतू ती कार्यवाही झालेली नाही. या शिक्षकांनी महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलत नक्षलग्रस्त गडचिरोली सारख्या दुर्गम भागात उपभोगल्याचे दिसुन येते. हा प्रवास करताना तो जवळच्या मार्गाने करावा असा शासनाचा आदेश आहे. मात्र प्रवास कसा, कुठल्या मार्गे झाला याचा उल्लेख कुठेच दिसुन येत नाही. या संदर्भात उस्मानाबाद जिल्हा मागासवर्गीय शिक्षक, शिक्षकेत्तर संघटनेने १८ मार्च २०१३ रोजी तक्रार केल्यानंतर या संदर्भात चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी. पाटील व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी के. टी. चौधरी यांची समिती नेमली गेली. पाटील यांनी १ जुन २०१३ तर चौधरी यांनी २० जुन २०१३ रोजी आपला चौकशी अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे सादर केला. या अहवालासंदर्भात चर्चा करुन मुख्य कार्यकारी अधिका-यांनी शिक्षण विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश २५ जुन रोजी दिले आहेत. मात्र अद्यापपर्यंत शिक्षण विभागाने या संदर्भात कुठलीच कार्यवाही केलेली नाही.
या प्रवास सवलतीमध्ये स्वामी रामानंद तिर्थ प्राथमिक विद्यालय उस्मानाबाद या शाळेच्या ८ कर्मचा-यांनी ७५ हजार ७४८ रुपये हडपले आहेत. बाजीराव पाटील प्राथमिक शाळेतील ८ कर्मचा-यांनी ६० हजार ३१७ रुपये, मराठी कन्या शाळा उस्मानाबाद येथील २१ कर्मचा-यांनी १ लाख ९९ हजार ६२१, रवि किरण प्राथमिक शाळा उस्मानाबाद येथील १ कर्मचा-याने ७ हजार ५८४, मराठी कन्या प्राथमिक शाळा वाघोली येथील ८ कर्मचा-यांनी ७० हजार ३९५ रु., डॉ. आंबेडकर प्राथमिक शाळा पाडोळा येथील ३ कर्मचा-यांनी १९ हजार ४४०, राजमाता कन्या शाळा समुद्रवाणी येथील ६ कर्मचा-यांनी ४६ हजार ९५५, रामवरदायनि प्राथमिक शाळा तुळजापूर येथील १७ कर्मचा-यांनी १ लाख ४६ हजार ८९६ रुपये, तुळजाभवानी प्राथमिक विद्यामंदिर तुळजापूर येथील २० कर्मचा-यांनी १ लाख ८३ हजार ५६८ रुपये, शांतीसागर विद्यामंदिर तुळजापूर येथील १२ कर्मचा-यांनी १ लाख ९ हजार ६४८ रुपये, रविंद्र विद्यामंदिर भूम येथील १५ कर्मचा-यांनी १ लाख ५३ हजार ७६० रुपये, गुरुदेवदत्त विद्यामंदिर भूम येथील १४ कर्मचा-यांनी १ लाख ३७ हजार ०८५ रुपये, भारत विद्यालय उमरगा येथील १८ कर्मचा-यांनी १ लाख ५५ हजार ६१२ रुपये, कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिर येथील ६ कर्मचा-यांनी ३९ हजार ५२६ रुपये, आदर्श प्राथमिक विद्यामंदिर उमरगा येथील १४ कर्मचा-यांनी १ लाख २७ हजार २०५ रुपये जिजामाता प्राथमिक शाळा उमरगा येथील ४ कर्मचा-यांनी २१ हजार ३१५ रुपये, श्रीकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर गुंजोटी येथील १६ कर्मचा-यांनी १ लाख ३९ हजार ५५५ रुपये आणि महात्मा गांधी प्राथमिक शाळा उमरगा येथील १२ कर्मचा-यांनी १ लाख ३ हजार ७४० रुपये एवढी रक्कम हडप केली आहे. चौकशी समितीच्या दोन सदस्यांनी केलेल्या चौकशीत ही बाब समोर आली असुन या समितीने ती संपूर्ण रक्कम संबंधित शिक्षक व कर्मचारी यांच्याकडून वसुलपात्र असल्याचे म्हटले आहे. शिवाय देयके सादर करण्यापूर्वी सक्षम अधिका-यांनी कुठलीही खात्री न करताच देयके सादर केली. त्यामुळे रजा प्रवासाचा लाभ मंजूर करण्यास जबाबदार असलेले संस्थेचे मुख्याध्यापक, संबंधित शिक्षक, कर्मचारी, वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथकाचे अधिक्षक व कर्मचारी शिस्तभंग विषयक कार्यवाहीस पात्र असल्याचा अहवाल चौकशी अधिका-यांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिला आहे. या अहवालावरुन संबंधित दोषी व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मागासवर्गीय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने केली आहे. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे.

* साभार : एकमत